Viral Video: ऑस्ट्रेलियन फॅनवर चढला इंडियन फिव्हर! पाकविरूद्धच्या सामन्यात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा; Video

Viral Cricket Video: या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
viral cricket video
viral cricket videotwitter(x)
Published On

Australian Cricket Fan Chanting Bharat Mata Ki Jay Video:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १८ वा सामना बलाढ्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरूतील चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स मोठ्या संख्येने हजर होते.

दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करण्यासाठी आलेला क्रिकेट फॅन 'भारत माता की जय'च्या घोषणा देताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानी फॅन्ससह भारतीय फॅन्स देखील मैदानावर उपस्थित होते. या सामन्यात भारत माता की जय चा जयघोष सुरू असताना,ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन देखील भारत माता की जयच्या घोषणा देताना दिसून आला आहे. (Latest sports updates)

viral cricket video
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,खांद्यावर ऑस्ट्रेलियाचा झेंडा अन् डोक्यावर ऑस्ट्रेलियाची कॅप असलेला फॅन 'भारत माता की जय' च्या घोषणा देतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तक पाकिस्तानने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने १६३ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने १२१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ५० षटकअखेर ३६७ धावा केल्या होत्या.

पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३६८ धावांची गरत होती. या धावांचा पाठलाग करताना इमाम उल हकने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफिकने ६४ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा डाव ३०५ धावांवर संपुष्टात आला.

viral cricket video
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com