आयसीसी विश्वचषक सुरु असताना मोठी बातमी हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे. आयसीसीने तात्काळ प्रभावाने ही कारवाई केली आहे. आयसीसीने आज झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आज शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत श्रीलंकेच्या बोर्डावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आयसीसीने केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विश्वचषकात श्रीलंका टीमच्या खराब कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंकेत खळबळ उडाली आहे. श्रीलंकेच्या एका खासदाराने त्यांच्या देशाची क्रिकेट संस्था बर्खास्त करण्याची मागणी केली आहे.
बेंगळुरूमध्ये लंकेने न्यूझीलंडमध्ये पाच गडी बाद केले. तर श्रीलंकेने नऊ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. श्रीलंकेची टीम भारताविरोधातील सामन्यात अवघ्या ५६ धावांवर सर्वबाद झाली होती.
तत्पूर्वी, श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघ यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बर्खास्त केलं आहे. माजी विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची क्रिकेट बोर्डाच्या ७ सदस्यांच्या अंतरिम समितीचं प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आयसीसीने आजच्या बैठकीत श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं असल्याचा ठपका ठेवला. बोर्डाच्या व्यवहारांचं स्वायत्तपणे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे, मात्र या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होतोय का? असा सवाल करत याबाबत खात्री करणं आवश्यक असल्याचं आयसीसीने म्हटलं. श्रीलंकेच्या बोर्डाच्या कारवाईवर आससीसी योग्य वेळी निर्णय घेईल, असंही आयसीसीनं म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.