IND vs SL: ....तर माझ्यावर वाईट कर्णधार असल्याचा ठपका बसेल; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित असं का म्हणाला?

Rohit Sharma Statement: श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी रोहितने आपल्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit sharma
Rohit sharmatwitter
Published On

Rohit Sharma Statement:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत फलंदाजीसह नेतृत्वाच्या बाबतीतही तो आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान आपल्या नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की, एक सामना कसा सर्वकाही उद्ध्वस्त करु शकतो हे मला चांगलच माहीत आहे.

'आम्ही परिस्थिती, धावफलकचा विचार करुन ठरवतो की पुढे काय करायचं. कधी कधी गोष्टी हव्या तशा घडतात. तर कधी कधी गोष्टी हाताबाहेर निघून जातात. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागतं. जर मला माहीत आहे की, मी एखादा निर्णय घेतोय जो संघाच्या हिताचा आहे तर ठीक आहे. मला माहीत आहे की, या गोष्टी कसं काम करतात. एका खराब सामन्यामुळे माझ्यावर वाईट कर्णधार असल्याचा ठपका बसेल.' असं रोहित शर्मा म्हणाला.

Rohit sharma
IND vs SL: टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी! नाणेफेक जिंकून काय घ्यावं? वाचा सविस्तर

तसेच तो पुढे म्हणाला की,'मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतोय. तरी संघ आणि परिस्थितीचा विचार डोक्यात नेहमीच सुरु असतो. असं मुळीच नाही की, मी फलंदाजीसाठी येतो आणि कसलाही विचार न करता बॅट फिरवतो. मला (बॅटचा) वापर कसा करायचा हे चांगल्याने माहीत आहे. माझ्या डोक्यात खूप गोष्टी सुरु असतात. त्यापैकीच एक म्हणजे मला चांगली फलंदाजी करायची आहे आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवायचं आहे.' (Latest sports updates)

Rohit sharma
Team India Playing XI: श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत श्रेयस अय्यरला डच्चू मिळणार? रोहित या ११ खेळाडूंना देणार स्थान

भारत - श्रीलंकेत रंगणार सामना..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना गुरुवारी( २ नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com