Team India Playing XI: श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत श्रेयस अय्यरला डच्चू मिळणार? रोहित या ११ खेळाडूंना देणार स्थान

India vs Srilanka Playing 11: पाहा कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११.
 team india
team indiaSaam TV
Published On

Team India Playing XI:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाही.

आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्याला या सामन्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

तर संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला गेल्या २ सामन्यात संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यरला गेल्या ६ सामन्यात केवळ १ अर्धशतक झळकावता आले आहे.यादरम्यान त्याने केवळ १३४ धावा केल्या आहेत.

या फलंदाजांना मिळू शकते संधी..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल मैदानावर येऊ शकतो. शुभमन गिलला अजूनही सुर गवसलेला नाही. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येणं जवळ जवळ निश्चित आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये ३५४ धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यरला गेल्या ६ सामन्यात केवळ १ अर्धशतक झळकावता आले आहे. यादरम्यान त्याने केवळ १३४ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

 team india
World Cup 2023 News: पुण्याच्या मैदानावर आफ्रिकेचा डंका, डुसेन अन् डिकॉकच्या शतकांच्या जोरावर उभारला ३५७ धावांचा डोंगर

या फलंदाजांना मिळू शकते संधी..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल मैदानावर येऊ शकतो. शुभमन गिलला अजूनही सुर गवसलेला नाही.

या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येणं जवळ जवळ निश्चित आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये ३५४ धावा केल्या आहेत.

अय्यरला संधी मिळेल का?

श्रेयस अय्यर फ्लॉप ठरत असला तरीदेखील त्याला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल खेळताना दिसून येऊ शकतो. संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यातही खेळताना दिसून येणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.

 team india
World Cup 2023 Semi Final: टीम इंडिया विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार आहे. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद शमी खेळताना दिसून येऊ शकतो. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा खेळताना दिसून येऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव

 team india
Quinton De Kock: निवृत्तीची घोषणा करणाऱ्या डी कॉकचा WC मध्ये राडा! डिव्हीलियर्सचा मोठा रेकॉर्ड मोडत, विराट- रोहितलाही सोडलं मागे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com