World Cup 2023 News: पुण्याच्या मैदानावर आफ्रिकेचा डंका, डुसेन अन् डिकॉकच्या शतकांच्या जोरावर उभारला ३५७ धावांचा डोंगर

World Cup 2023 News: पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट सामना होत आहे.
World Cup
World CupSaam Tv
Published On

World Cup New Zealand vs South Africa:

पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान क्रिकेट सामना होत आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघ लढत आहेत. न्युझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यास निमंत्रण दिलं. याचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३५७ धावा करत न्युझीलंडच्या संघाला ३५८ धावांचे आव्हान दिलंय. (Latest News)

न्युझीलंडच्या संघाचे कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरलाय. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज वार डर डुसेनने १३१ धावा केल्या. तर क्किंटन डिकॉकने फटकेबाजी करत ११४ धावा केल्या. त्यानंर शेवटच्या षटकामध्ये डेविड मिलरने ३० चेंडूमध्ये ५२ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३५७ धावा केल्या. तर न्युझीलंडच्या संघाकडून गोलंदाजी करताना साउदीने ७७ धावा देत २ विकेट घेतल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर क्किटन डि कॉकने किवीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. क्विंटन डी कॉकने ११६ चेंडूत ११४ धावांची स्फोटक खेळी खेळली. क्विंटन डी कॉकने या १० चौकार आणि ३ षटकार मारत ही धाव संख्या गाठलीय. यासह क्विंटन डी कॉकने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ५४५ धावा केल्या आहेत.

World Cup
David Willey Retirement: वर्ल्डकप सुरु असतानाच इंग्लंडला मोठा धक्का! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com