David Willey Retirement: वर्ल्डकप सुरु असतानाच इंग्लंडला मोठा धक्का! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती

David Willey Retirement: वर्ल्डकप सुरु असताना इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
david willey
david willeysaam tv news
Published On

David Willey Retirement:

वनडे वर्ल्डकप स्पर्धा ही इंग्लंडसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेली नाही. स्टार खेळाडूंची भरमार असलेल्या इंग्लंडने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यापैकी ५ सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली.

इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमधून जवळजवळ बाहेर झाला आहे. तर २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतूनही इंग्लंडचा संघ बाहेर होऊ शकतो. दरम्यान इंग्लंडचा संघ अडचणीत असताना संघातील वेगवान गोलंदाजाने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरु असताना इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने (David Willey) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करणार आहे.

ज्यात त्याने लिहीले आहे की, 'मला नेहमी वाटायचं की हा दिवस नाही आला पाहिजे. मी नेहमी इंग्लंडसाठी खेळण्याचाच विचार केला. मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय की, आता आतंरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करण्याची वेळ आली आहे. मी अभिमानाने ही जर्सी घातली आणि छातीवर असलेल्या बॅचसाठी सर्व काही समर्पित केलं.'

david willey
World Cup Points Table: भारत- पाकिस्तानात होणार वर्ल्डकपची सेमीफायनल? बांगलादेशच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

कुटुंबियांचे मानले आभार..

मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मला जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंसोबत आणि संघासोबत मला खेळण्याची संधी मिळाली. मी या प्रवासात नवीन मित्र बनवले. माझी पत्नी, दोन मुलं, आई- वडील, माझा त्याग आणि खेळाप्रती असलेलं समर्थन नसतं तर हे शक्य होऊ शकलं नसतं. मी सर्वांचे आभार मानतो.' (Latest sports updates)

अशी राहिलीये कामगिरी..

डेव्हिड विलीने २०१५ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केलं होतं. मात्र खेळात सातत्य नसल्याने त्याला संघात स्थान टीकवून ठेवता येत नव्हतं. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ७० वनडे सामन्यांमध्ये ९४ गडी बाद केले.

तर ४३ वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावे ५१ गडी बाद करण्याची नोंद आहे. त्याने आपल्या दमदार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com