पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हा पाकिस्तानचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील तिसरा विजय ठरला आहे. या विजयासह पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.
या विजयासह अफगाणिस्तानला मागे सोडत पाकिस्तानने पाचव्या स्थानी कब्जा केला आहे. या दोन्ही संघांचे ६-६ गुण आहेत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तानने आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी सेमी फायनल गाठणं सोपं नसणार आहे. कारण पुढील दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देताना दिसून येत आहे.
अफगाणिस्तानने देखील ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानने पुढील सामने जर मोठ्या फरकाने जिंकले तर पाकिस्तानला मागे सोडत अफगाणिस्तानचा संघ देखील सेमीफायनलमध्ये दाखल होऊ शकतो.
पाकिस्तानच्या विजयानंतर टॉप ४ संघांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. यजमान भारतीय संघ ६ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर १० गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. प्रत्येकी ४-४ सामने जिंकणारा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ जर गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिला आणि भारतीय संघ जर पहिल्या स्थानी असेल तर भारत आणि पाकिस्तानात पहिल्या सेमीफायनलचा थरार पाहायला मिळू शकतो. (Latest sports updates)
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा संघ ६-६ गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा नेट -०.०२४ इतका आहे. तर अफगाणिस्तानचा नेट रनरेट -०.७१८ आहे. ४ गुणांसह श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानी आहे. ४ गुणांसह नेदरलँडचा संघ आठव्या स्थानी तर २ गुणांसह गतविजेता इंग्लंडचा संघ नवव्या स्थानी आहे.
पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेला बांगलादेशचा संघ अधिकृतरित्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २ गुणांसह बांगलादेशचा संघ सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.