pak vs ban
pak vs bantwitter

PAK vs BAN: पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांच लोटांगण! जिंकण्यासाठी २०५ धावांंचं आव्हान

Pakistan vs Bangladesh : पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रोमांचक सामना सुरु आहे.
Published on

Pakistan vs Bangladesh :

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३१ वा सामना बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय त्यांना योग्य ठरवता आला नाही. कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा डाव अवघ्या २०४ धावांवर संपुष्टात आला आहे. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २०५ धावांची गरज आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सुरुवातीलाच फसला कारण हसन खाते ही न उघडता माघारी परतला. लिटन दासने एक बाजू धरून ठेवली. त्याने डावाची सुरुवात करताना ४५ धावांची खेळी केली. संघातील अनुभवी फलंदाज महमदुल्लाह या सामन्यातही चमकला. त्याने ७० चेंडूत ५६ धावा चोपल्या. (Latest sports updates)

pak vs ban
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

तर कर्णधार शाकीब अल हसनने ४३ धावांचं योगदान दिलं. शेवटी मेहदी हसनने २५ धावांची खेळी केली. मात्र बांगलादेशचा डाव अवघ्या २०४ धावांवर संपुष्टात आला.

पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी आणि वसीमने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर हॅरिस रऊफने २, अहमद आणि मिरने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

pak vs ban
World Cup Points Table: अफगाणिस्तानच्या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! या ३ संघांचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com