वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीपने यादवने टाकलेल्या एका चेंडूची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने एक भन्नाट चेंडू टाकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची दांडी गुल केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी २३० धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच इंग्लंडला मोठे धक्के दिेले. अवघ्या ३९ धावसंख्येवर इंग्लंडचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. इंग्लंडच्या कर्णधाराने जबाबदारी स्विकारत मोईन अलीसोबत मिळून डाव सावरायला सुरुवात केली. दोघांमध्ये १३ धावांची भागीदारी होताच कुलदीप यादवने इंग्लंडला मोठा धक्का दिला.
भारतीय संघाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला होता. त्याने ओव्हर द विकेटचा मारा करत ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला. हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त फिरला आणि जोस बटलरचा मधला स्टम्प उडवून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)
भारतीय गोलंदाज चमकले..
या मैदानावर १२ पैकी ९ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. त्यामुळे इंग्लंड हा सामना जिंकणार असं म्हटलं जात होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत २३० धावांचा यशस्वी बचाव केला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने ३ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर गडगडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.