World Cup Points Table: इंग्लंडच्या पराभवानं पाकिस्तानचा कसा झाला फायदा? टीम इंडियामुळं मिळणार सेमिफायनलचं तिकट, वाचा समीकरण!

World Cup Points Table Semi Final Scenario: वाचा पाकिस्तानसाठी कसं आहे समीकरण.
World Cup Points Table Semi Final Scenario
World Cup Points Table Semi Final ScenarioSaam tv news
Published On

World Cup Points Table Semi Final Scenario:

पाकिस्तानला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला ६ पैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तानची वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याची वाट खडतर झाली आहे. मात्र इंग्लंडच्या पराभवानंतर पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे. कसं असेल पाकिस्तानचं वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण?

पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर, पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सला अशी प्रार्थना करावी लागेल की भारतीय संघाने सर्व सामने जिंकावेत. जर भारतीय संघाने पुढील सर्व सामने जिंकले तर, पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

World Cup Points Table Semi Final Scenario
IND vs ENG: सतत संधी मिळूनही पुन्हा तीच चुक! रोहितचा खास भिडू वाढवतोय टीम इंडियाचं टेन्शन

भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा फायदा पाकिस्तानला झाला आहे. कारण १०० धावांनी पराभूत झालेला इंग्लंडचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. इंग्लंडचे पुढील ३ सामने ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो. हे सर्व सामने जिंकले तरी इंग्लंडला सेमीफायनलचं तिकीट मिळणं कठीण आहे. (Latest sports updates)

World Cup Points Table Semi Final Scenario
Jos Buttler Statement: दारुण पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार खचला; म्हणतो,' आम्ही चांगलं खेळलो पण...'

इंग्लंडचा संघ १०० धावांनी पराभूत झाला आहे. त्यामुळे त्यांचा नेट रन रेटही कमी झाला आहे. आता पाकिस्तानकडे सुवर्णसंधी असणार आहे. पाकिस्तानला पुढील ३ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानचे पुढील ३ सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघासोबत होणार आहे. हे ३ सामने जिंकले तर पाकिस्तानचे १० गुण होतील.

नेट रन रेट जर चांगला असेल तर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये एन्ट्री मिळू शकते. सध्या ६ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या, इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी आहे.

World Cup Points Table Semi Final Scenario
World Cup Points Table: दुगना लगान वसूल! इंग्लंडला लोळवून टीम इंडिया पहिल्या स्थानी; कोण टॉप ४ मध्ये, कोण बाहेर जाणार? पाहा पॉइंट टेबल

पाकिस्तानचा संघ जास्तीत जास्त १० गुणांपर्यंत पोहचू शकतो. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अनुक्रमे ८-८ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. या दोन्ही संघांचे ३-३ सामने शिल्लक आहेत. दोन्ही संघांनी जर २-२ सामने गमावले तर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा होऊ शकतो. पाकिस्तानसह अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँडलाही समान संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com