World Cup 2023 Semi Final: टीम इंडिया विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Cricket World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार की नाही? याबाबतचं समीकरण समोर आले आहे.
 team india
team indiaSaam TV
Published On

Cricket World Cup:

विश्वचषकात ३२ सामने झाल्यानंतर स्पर्धेत चांगलीच चुरस वाढली आहे. अद्याप विश्वचषकाच्या सेमी फायनलला कोणते चार संघ पोहोचणार,याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. विश्वचषकाच्या गुणतालिकेत टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर आहे. तर सध्या पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिका संघ आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसरा आणि चौथ्या स्थानावर न्यूझीलंड पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार की नाही? याबाबतचं समीकरण आता समोर आले आहे. (Latest Marathi News)

 team india
Diwali 2023 Muhurt: यंदाचा दिवाळी सण कधी? जाणून घ्या या सणाचे महत्व आणि शुभ मुहूर्त

टीम इंडिया १२ गुणासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाला विश्वचषकातील सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी आणखी एका गुणाची आवश्यकता आहे. टीम इंडिया शेवटच्या तीन सामन्यापैकी कोणताही एक सामना जिंकला किंवा अनिर्णयीत झाला तरी सेमी फायनलला पोहोचू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 team india
Relationship Tips : लग्न करण्याचा विचार करताय? जोडीदाराला अवश्य विचारा हे ४ प्रश्न

गुणतालिकेच्या क्रमवारीतील पहिल्या चार संघानंतर इतर संघ आता केवळ १२ गुण मिळवू शकतात. त्यात उद्या म्हणजे २ नोव्हेंबर रोजी भारताचा श्रीलंकेशी सामना होणार आहे. यानंतर ५ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँडशी होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेलाही एका धावाची गरज आहे. या स्पर्धेत कोणत्याही संघाने सात सामने जिंकले तर सेमी फायनलला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारताने श्रीलंकेला बाद केले तर सेमी फायनलला जायचे दरवाजे खुले होणार आहे. त्यात ९ सामने संपल्यानंतर टीम इंडिया कोणत्या स्थानावर राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 team india
World Cup 2023 News: पुण्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने किवींची उडवली दाणादाण, १९० धावांनी मिळवला विजय

९ सामने झाल्यावर टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिल्यास त्याचा सेमी फायनलमध्ये फायदा होऊ शकतो. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या साखळी फेरीत टीम इंडियाने पहिल्या स्थानावर राहणे महत्वाचे मानले जात आहे. या साखळी फेरीत टीम इंडिया किती सामने जिंकते, यावरून सेमी फायनलचे समीकरण ठरणार आहे.

 team india
ICC ODI Ranking: पाकिस्तान पिछाडीवर पण बाबर अन् आफ्रिदी आघाडीवर! ICC च्या यादीत गाठलं अव्वल स्थान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com