Diwali 2023 Muhurt: यंदाचा दिवाळी सण कधी? जाणून घ्या या सणाचे महत्व आणि शुभ मुहूर्त

Diwali Shubh Significance in Marathi: दिवाळी हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी प्रत्येक घरात तेलाचे दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीसह गणेशाची पूजा केली जाते.
5 days of Diwali 2023
5 days of Diwali 2023Saam Tv
Published On

Diwali 2023 Festival Dates:

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी प्रत्येक घरात तेलाचे दिवे लावले जातात आणि देवी लक्ष्मीसह गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीची तयारी काही महिने अगोदरच सुरू होते, ज्यामध्ये लोक आपली घरे साफ आणि रंगवायला सुरुवात करतात.

असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर आणि घराघरांत प्रवेश करते. अशा स्थितीत लोक देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपली घरे (Home) सजवण्यात आणि पूजा करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धनाची देवी लक्ष्मी जिथे जिथे पाऊल ठेवते, तिथे त्या घरामध्ये धन, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा वर्षाव होतो. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी दिवाळीचा सण कोणत्या दिवशी साजरा (Celebrate) केला जाईल आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे.

5 days of Diwali 2023
EMI Loan : कर्जाचा हप्ता फेडताना नाकीनऊ येताय? या 4 टिप्स फॉलो करा, लवकरच होईल कर्जातून मुक्ती
5 days of Diwali 2023
Diwali Offers : SBI क्रेडिट कार्डवर मिळवा 27 टक्क्यांपर्यंतची कॅशबॅक ऑफर, कसा मिळवता येईल फायदा? वाचा सविस्तर

इतिहास

दिवाळीचा सण भगवान रामाच्या विजयाशी जोडलेला आहे. असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी लंकापती रावणाचा वध केल्यानंतर प्रभू राम माता सीतेसह अयोध्येला परतले. आपल्या राजाचे आगमन होताच अयोध्येतील जनतेने दिवे लावून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा इथून सुरू झाली.

पद्म पुराण आणि स्कंद पुराणातही दिवाळी (Diwali) सणाचे वर्णन आढळते. यामागे एक खगोलशास्त्रीय घटनाही आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार, ग्रहांचा राजा सूर्य कार्तिक महिन्यात आपली स्थिती बदलतो. दिवस लहान आणि रात्र मोठी होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशीही एक मान्यता आहे. यमराज-नचिकेताची कथाही या उत्सवाशी संबंधित आहे.

5 days of Diwali 2023
Diwali Cleaning Tips: दिवाळीच्या आधी घराची साफसफाई झटपट करण्याच्या ५ ट्रिक्स, घर दिसेल चककीत

तारीख

यंदा दिवाळीच्या तारखेबाबत सर्वच जण संकोचात आहेत. दिवाळीचा सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिव्यांचा सण दिवाळी साजरी केली जाते. अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होईल आणि 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 वाजता समाप्त होईल.

5 days of Diwali 2023
Diwali Bonus 2023 : खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून सणासुदीत भेट

पूजा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार संध्याकाळी 05:47 PM - 07:43 PM

छोटी दिवाळी 11 नोव्हेंबर 2023 शनिवार संध्याकाळी 5:39 PM - 8:16 PM

नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर 2023 रविवार संध्याकाळी 05:39 PM - 07:35 PM पर्यंत आहे

बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजा 13 नोव्हेंबर 2023 सोमवार सकाळी 6:14 AM - 8:35AM

भाऊबीज 14 नोव्हेंबर 2023 मंगळवार दुपारी 1:10 PM 3:22 PM

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com