घरच्या वाढत्या किमती पाहाता घर खरेदी करताना आपल्या डोक्यात सगळ्यात आधी विचार येतो तो कर्ज घेण्याचा. हल्ली बँका देखील कर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करुन देतात.
जर आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कोणत्याही बँकेतून आपल्याला सहज लोन मिळते. परंतु, बरेचदा कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते फेडताना आपल्या नाकी नऊ येतात. ज्यामुळे EMI भरण्यास उशीर होतो. अशावेळी EMI साठी अधिक पैसे भरावे लागतात. त्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही कर्जाच्या झंझटीतून लवकरच मुक्त व्हाल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. मॅनेजरला पूर्व सूचना द्या
तुमचा ईएमआयचा (EMI) हप्ता चुकणार असेल किंवा पैसे भरण्यास उशीर होणार असेल तर बँकेच्या मॅनेजराला याची पूर्वकल्पना द्या. ज्यामुळे तुमचा होल्डसाठीही अर्ज करु शकता.
2. कर्जाची पुनर्रचना
कर्ज घेताना तुमची आर्थिक (Money) स्थिती पूर्वी सारखी नसेल तर कर्जाचे पुनर्गठन करणे चांगला पर्याय आहे. त्याच्या मदतीने तुम्ही कर्जाचा सध्याचा EMI कमी करु शकता. तसेच कर्जाचा हप्ता देखील वाढवू शकता.
3. थकबाकी EMI निवडा
ज्यावेळी कर्ज (Loan) घेतले जाते, तेव्हा बँकेकडून महिन्याच्या सुरुवातीला EMI कट केला जातो. त्याला आगाऊ EMI असे म्हटले जाते. थकबाकी EMI अंतर्गत, पैसे महिन्याच्या शेवटी कापले जातात. यामुळे तुम्हाला थकबाकी EMI मध्ये पैसे जमा करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
4. क्रेडिट अहवाल
ईएमआयची परतफेड करण्यास उशीर करता तेव्हा बँकेकडून क्रेडिट ब्युरोला याची माहिती दिली जाते. तुम्ही EMI भरणार नाही तेव्हा बँकेशी बोला. यासाठी तुम्ही क्रेडिट रिपोर्टमध्ये ईएमआयचा अहवाल न देण्याची विनंती देखील करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.