Vishal Gangurde
दिवाळी भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार सण आहे.
दिवाळीला घराची साफसफाई केल्यानंतर प्रसन्न वातावरण निर्माण होतं.
घराची साफसफाई करण्यासाठी २०-२५ दिवस सुरुवात करावी लागते.
घराची साफसफाई करण्याआधी न लागणारी भांडी, कपडे आणि चपला गरजू व्यक्तींना द्या
घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी कॉटनचे कपडे वापरता येतील. तसेच बेकिंग पावडर, अर्धा बकेट सर्फचे पाणी, व्हाइट व्हिनेगर, ब्रश या वस्तूंचाही वापर करू शकता.
घरातील शो पीस वस्तू, सोफा सेट, बेड,फोटो फ्रेम, पेंटिंग, फर्निचर एका कपड्याने किंवा पेपरने झाकून ठेवा.
घरातील झुरळ काढण्यासाठी लांब स्टिक असलेल्या ब्रशचा वापर करू शकता.
पंख्याची साफसफाई करण्यासाठी डिटर्जंटच्या पाण्याचा वापर करू शकता. या पाण्यात कोरडा कपडा भिजवून पंखा पुसून घ्या. पंखा पुसल्यानंतर अगदी नवा दिसेल.