Quinton De Kock: निवृत्तीची घोषणा करणाऱ्या डी कॉकचा WC मध्ये राडा! डिव्हीलियर्सचा मोठा रेकॉर्ड मोडत, विराट- रोहितलाही सोडलं मागे

World Cup 2023 Records: या सामन्यात क्विंटन डी कॉकने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
Quinton De Kock
Quinton De KockTwitter
Published On

Quinton De Kock World Cup 2023 Record:

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने १७४ धावांची खेळी केली. या डावात १०१ चेंडूंचा सामना करत त्याने शतक पूर्ण केलं. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पाचव्या सामन्यातील हे त्याचं तिसरं शतक ठरलं आहे. हे शतक पूर्ण करताच त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याने १४० चेंडूंचा सामना करत १७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ७ षटकार मारले. यापूर्वी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने १०० धावांची खेळी केली होती.

तर लखनऊच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना त्याने १०९ धावा ठोकल्या होत्या. हे शतक पूर्ण करताच त्याने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ३०० धावांचा पल्ला गाठत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे.

Quinton De Kock
World Cup Points Table: बांगलादेश सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर!पाकिस्तानसह या ४ संघांवरही टांगती तलवार

एबी डिव्हीलियर्सचा रेकॉर्ड मोडला...

हा क्विंटन डी कॉकच्या कारकिर्दीतील १५० वा वनडे सामना होता. हा सामना खास बनवत त्याने मोठी खेळी केली. या खेळीसह तो कुठल्याही वर्ल्डकप स्पर्धेत तीन शतके झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हीलियर्सच्या नावे होता. २०१५ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एबी डिव्हीलियर्सने दोन शतके झळकावली होती. या शतकी खेळीसह त्याने सौरव गांगुली,मार्क वॉ, मॅथ्यू हेडन, आणि डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माच्या नावे आहे. रोहितने २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत ५ शतके झळकावली होती. (Latest sports updates)

Quinton De Kock
World Cup 2023: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

वानखेडेवर क्विंटन डी कॉकचं वादळ...

क्विंटन डी कॉकने या सामन्यात १४० चेंडूंचा सामना करत १७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १५ चौकार आणि ७ षटकार मारले. या सामन्यात त्याला दुहेरी शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती.

मात्र ४६ वे षटक सुरू असताना हसन महमुदच्या गोलंदाजीवर नासुम अहमदने झेलबाद करत त्याला माघारी धाडले. त्याने १२९ चेंडूवर १५० धावा पूर्ण केल्या. यासह तो वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ४०० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com