World Cup 2023: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

World Cup 2023 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
World Cup 2023 Points Table
World Cup 2023 Points TableTwitter
Published On

World Cup 2023 Points Table, SA vs BAN Match:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १४९ धावांनी जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे सोडत टॉप २ मध्ये प्रवेश केला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी ८-८ गुण आहेत. मात्र नेट रन रेट चांगला असल्याने दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. (World Cup 2023 Points Table)

भारतीय संघ १० गुणांसह या यादीत पहिल्या स्थानी आहे. भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी पोहचण्यासाठी भारतीय संघाला जोरदार टक्कर देताना दिसून येत आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानी आणि पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानचा संघ सहाव्या स्थानी आहे. या तीनही संघांचे प्रत्येकी ४-४ गुण आहेत. मात्र नेट रन रेट चांगला असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ पुढे आहे.

अफगाणिस्तानच्या पराभवाचा नेदरलँड, श्रीलंका आणि इंग्लंडला मोठा फायदा झाला आहे. नेदरलँडचा संघ सातव्या स्थानी, श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानी आणि इंग्लंडचा संघ नवव्या स्थानी पोहोचला आहे. या तीनही संघांना केवळ १-१ सामना जिंकण्यात यश आलं आहे.

World Cup 2023 Points Table
World Cup 2023: न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली दलाई लामांची भेट! इंग्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी घेतले आशीर्वाद; Photo व्हायरल

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद ३८२ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने सर्वाधिक १७४ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

World Cup 2023 Points Table
World Cup 2023 : वानखेडेवर डिकॉकची तुफान फटकेबाजी; बांगलादेशसमोर ३८३ धावांचं तगडं आव्हान

तर क्लासेनने ९० धावांची आणि एडेन मार्करमने ६० धावांची खेळी केली. बांगलादशकडून या धावांचा पाठलाग करताना महमदुल्लाहने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली . कारण बांगलादेशला या सामन्यात १४९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com