World Cup 2023: न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली दलाई लामांची भेट! इंग्लंडविरूद्धच्या लढतीपूर्वी घेतले आशीर्वाद; Photo व्हायरल

New Zealand Cricket Team Meets Dalai Lama: न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दलाई लामा यांची भेट घेतली आहे.
New Zealand Cricket Team Meets Dalai Lama
New Zealand Cricket Team Meets Dalai Lamasaam tv news
Published On

New Zealand Cricket Team Meets Dalai Lama:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रविवारी(२२ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ अजूनही धरमशाळेत आहे.

दरम्यान मंगळवारी( २४ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली आहे. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दलाई लामा यांच्यासोबत केन विलियम्सन, ट्रेन्ट बोल्ट, टॉम लेथम ,लॉकी फर्ग्युसन आणि संघातील उर्वरीत खेळाडू असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दलाई लामा यांचा आशिर्वाद घेतला. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.

न्यूझीलंड पुढील सामना येत्या २८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे. हा सामना देखील धरमशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे.

संघाचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे खेळताना दिसून येत नाहीये. त्याच्या ऐवजी टॉम लेथम न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करताना दिसून येत आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला धुळ चारली आहे. न्यूझीलंडला गेल्या ४ सामन्यांमध्ये केवळ एकाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच मैदानावर खेळताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता . (Latest sports updates)

New Zealand Cricket Team Meets Dalai Lama
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिकूंन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १२७ चेंडूंचा सामना करत १३० धावांची खेळी केली होती . तर रचिन रविंद्रने ८७ चेंडूंचा सामना करत ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २७३ धावांचा डोंगर उभारला होता.

New Zealand Cricket Team Meets Dalai Lama
IND vs NZ: विश्वासच बसेना..! जडेजाने सोपा झेल सोडल्यानंतर बायकोला आश्चर्याचा धक्का; दिलेली रिॲक्शन होतेय व्हायरल, Video

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडने दिलेलं आव्हान भारतीय संघाने ६ गडी आणि १२ चेंडू राखून पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com