IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

Best Fielder Award Video: या सामन्यानंतर हटके पद्धतीने बेस्ट फिल्डरची घोषणा करण्यात आली आहे.
Best Fielder Award Video
Best Fielder Award VideoSaam tv news

Team India Best Fielder Medal:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नवा ट्रेन्ड पाहायला मिळाला आहे. प्रत्येक सामन्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला मेडल दिलं जातं. सामना झाल्यानंतर यष्टीरक्षण प्रशिक्षक टी दिलीप उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची निवड करतात. यावेळी त्यांनी हटके पद्धतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोहम्मद शमी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना दिसून येत आहे.

त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये टी दिलीप क्षेत्ररक्षणाबद्दल चर्चा करताना दिसून येत आहेत. या सामन्यात भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणात काही चुका झाल्याचं पाहायला मिळाले. या चुकांवर त्यांनी भाष्य केलं. या व्हिडिओमध्ये ते विराट कोहली, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर यांचं कौतुक करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

कोणाला मिळालं मेडल?

गेल्यावेळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची घोषणा हटके पद्धतीने करण्यात आली होती. या सामन्यात जडेजाने पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल टिपला होता. या सामन्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या मोठ्या स्क्रीनवर जडेजाच्या झेलचा व्हिडिओ प्ले करण्यात आला आणि त्यानंतर जडेजाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं मेडल देण्यात आलं होतं.

Best Fielder Award Video
Rohit Sharma Record: NZ विरूद्ध अवघ्या इतक्या धावा करताच हिटमॅन रचणार इतिहास!मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूंना सोडणार मागे

यावेळी टी दिलीप यांनी नवा अविष्कार केल्याचे पाहायला मिळाले आहे. टी दिलीप यांनी सर्व खेळाडूंना मैदानावर येण्यास सांगितलं. सर्व खेळाडू विचार करत होते की, यावेळी मेडल विजेत्याची घोषणा कशी केली जाईल.

इतक्यात स्पायडर कॅमवर विजेत्या श्रेयस अय्यरचा फोटो झळकला. रविंद्र जडेजाने श्रेयस अय्यरच्या गळ्यात मेडल घातलं. नंतर स्पायडर कॅमवर असलेला फोटो कुलदीपने श्रेयस अय्यरने गळ्यात घातला. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com