IND vs SL: भारत- श्रीलंका लढतीपूर्वी जय शाह यांची मोठी घोषणा! वानखेडेवर या गोष्टीसाठी घातली बंदी

Jay Shah Announcement: भारत - श्रीलंका सामन्यापूर्वी जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.
JAY SHAH
JAY SHAHSaam tv news
Published On

Jay Shah Announcement:

वर्ल्डकप स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. या स्पर्धेदरम्यान लेजर शो आणि फायरवर्क्स हे प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दरम्यान या संकटाला तोंड देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मुंबई शहरातील हवेच्या पातळीतील गुणवत्ता दिवसेंदिवस खालावतेय.

या समस्येला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने खबरदारी म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईत होणाऱ्या वर्ल्डकपच्या सामन्यासाठी आतषबाजी होणार नाही.

रोहितने स्टोरी शेअर करत व्यक्त केली चिंता..

रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघासोबत मुंबईत दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये त्याने विमानाच्या खिडकीतून फोटो काढला आहे. या फोटोवर कॅप्शन म्हणून त्याने,'मुंबई हे काय झालंय..'असं लिहिलंय. (Latest sports updates)

JAY SHAH
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

भारत- श्रीलंकेत रंगणार सामना..

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सलग सातवा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

JAY SHAH
World Cup Points Table: भारत- पाकिस्तानात होणार वर्ल्डकपची सेमीफायनल? बांगलादेशच्या पराभवानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने ६ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. ४ गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com