बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँडच्या क्रिकेट संघात वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना होत आहे. वर्ल्ड कपच्या ४५ व्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडच्या विरोधात धावांची आतिषबाजी केली. टीम इंडियाने ५० षटकात ४ गडी गमावून ४१० धावा केल्या असून नेदरलँडच्या संघाला ४११ धावा करण्याचं आव्हान दिलंय. (Latest News)
या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजी केलीशिवाय त्याने एक विकेट घेतली. विराटने विकेट घेतल्यानंतर पत्नी अनुष्काने हटके सेलिब्रेशन केलं. आपल्या सीटवरून उडी मारून तिने आनंद साजरा केला. विकेट घेतल्यानंतर कोहलीनेही तिच्याकडे पाहत आनंद साजरा केला.
'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडच्या संघाची सुरुवात खराब झाली. नेदरलँडच्या संघाने २०८ धावांवर त्यांनी ७ विकेट गमावल्या होत्या. दरम्यान या सामन्यात कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीने गोलंदाजी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने २३व्या षटकात विराटकडे चेंडू सोपवला होता.
दरम्यान विराट कोहलीला गोलंदाजी करण्यासाठी द्या, असं चाहत्यांनी विनंती केली होती. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. चाहत्यांची ही अपेक्षा देखील या सामन्यात पूर्ण झाली कारण मोहम्मद सिराज मानेच्या दुखापतीने मैदानाबाहेर गेला. त्यानंतर रोहितने विराट कोहलीला गोलंदाजी दिली. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ पाच गोलंदाजांसह उतरलाय. सिराज दुखापतीमुळे सिराज रेसिंग रूममध्ये गेल्यामुळे रोहितने कोहलीला गोलंदाजी दिली.
कोहलीने रोहितचा विश्वास सार्थ ठरवत फलंदाजी करताना ५१ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या षटकात ७ धावा दिल्या. दुसऱ्या षटकात कोहलीने नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला १७ धावांवर बाद केलं. एकदिवसीय क्रिकेटमधील कोहलीची ही पाचवी विकेट होती. कोहलीने ९ वर्षांनंतर पहिली विकेट घेतली.
विराटला विकेट मिळाल्यानंतर पत्नी अनुष्का शर्मांने जोरदार सेलिब्रेशन केलं. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काने सीटवरून उडी मारत आनंद साजरा केला. उभे राहून कोहलीला अभिवादन केले. विकेट घेतल्यानंतर विराट कोहलीनेही लगेच तिच्याकडे पाहिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.