RR vs GT match fixing Video Latest News : शुभमन गिलच्या गुजरातने (GT) राजस्थानचा (RR) दारूण पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी (RCB) आणि गुजरात यांच्यात रविवारी (RCB vs GT IPL Final) लढत असेल. पण क्वालिफायर २ मधील गुजरातच्या विजयापेक्षा मॅच फिक्सिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. सामना सुरू होण्याआधीच मैदानात झालेल्या त्या घटनेमुळे मॅच फिक्सिंगच्या चर्चेला सुरूवात झाली अन् सोपा झेल सोडल्याने त्याला आणखी खतपाणी घातलं गेलं.
गुजरात आणि राजस्थान यांच्यातील सामन्यादरम्यान झालेल्या नाणेफेकीनंतर (Toss) सोशल मीडियावर थेट 'मॅच फिक्सिंग'चे आरोप केले जात आहेत. पहिल्यांदा टॉस जिंकूनही गुजरातला निर्णय घेता न आल्याने क्रिकेट चाहत्यांनी पंचांच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
सामन्याच्या सुरुवातीला गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणे हवेत उडवले आणि राजस्थानचा कर्णधार रियान परागने 'छापा' (Heads) अशी घोषणा केली. नाणे जमिनीवर पडले तेव्हा 'काटा' (Tails) आला होता. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या गुजरातने ही नाणेफेक जिंकली होती. मात्र, सामनाधिकारी (Match Referee) प्रकाश भट्ट यांनी आपल्याला रियान परागचे बोलणे स्पष्ट ऐकू आले नाही, असा दावा केला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा प्रचंड आवाज असल्यामुळे रियानने 'छापा' म्हटलं की 'काटा' हे ऐकू आले नाही, असे सांगत प्रकाश भट्ट यांनी पुन्हा नाणेफेक करण्याचा अजब निर्णय घेतला. यावेळी कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा नाणेफेक करण्यास सांगितले. दुसऱ्यांदा झालेल्या नाणेफेकीचा कौल मात्र राजस्थानच्या बाजूने लागला. रियान परागने टॉस जिंकून थेट प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पहिल्या नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलने टॉस जिंकला असता, तर त्यालाही या मैदानावर प्रथम फलंदाजीच करायची होती, असे त्याने नंतर स्पष्ट केले. मात्र, पहिल्यांदा टॉस स्पष्टपणे गिलने जिंकलेला दिसतानाही, पंचांना रियानचे बोलणे ऐकू कसे गेले नाही? असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी आयपीएल प्रशासनाला धारेवर धरले आहे. "हा सरळ सरळ फिक्सिंगचा प्रकार आहे," अशा कमेंट्स करत चाहत्यांनी या ड्रामावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
टॉसच्या गोंधळानंतर सामन्यादरम्यान मैदानात आणखी एक अशी घटना घडली, त्यामुळे फिक्सिंगचा संशय घेणाऱ्या चाहत्यांच्या चर्चेला आणखी बळ मिळाले. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये नांद्रे बर्गरच्या पहिल्याच शॉर्ट बॉलवर गुजरातच्या साई सुदर्शनने पुल शॉट मारला. पण, बॉल बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत खूप उंच गेला.
फॉरवर्ड स्क्वेअर लेगवरून धावत आलेला डोनोवन फरेरा बॉलच्या रेषेत येऊ शकला नाही. मागे पडत-पडत त्याने अत्यंत सोपा आणि हातात आलेला कॅच जमिनीवर टपकवला. सुदर्शनला मिळालेल्या या जीवदानामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ सामन्यात खूप मागे पडला. गिल आणि