

Early Morning Signs of Heart Attack : धावपळीचं आयुष्य आणि वाढता ताणतणाव, यामुळे हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण अनेकदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर काही संकेत देत असते, त्याकडे आपण सामान्य थकवा किंवा गॅस समजून दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे सकाळी उठल्या उठल्या जाणवतात. शरीराने दिलेले हे '६ धोक्याचे सिग्नल' कोणते आहेत? वेळीच सावध कसे व्हावे?
हृदयविकाराच्या झटका येण्याआधीच लक्षणे ओळखल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. ही लक्षणे सकाळी झोपेतून उठल्यावर दिसू शकतात आणि ती सूक्ष्म असू शकतात. याचा संबंध सर्केडियन रिदमशी (circadian rhythms) आहे. त्यामुळे जागे झाल्यावर हृदय व रक्तवाहिन्यांवरील ताण वाढतो. सकाळी दिसू शकणारी हृदयविकाराच्या झटक्याची ६ प्रमुख लक्षणे पाहूयात..
छातीत अस्वस्थता
सकाळी उठल्यानंतर छातीत अस्वस्थ वाटणं हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. सकाळी ६ ते दुपारी १२ च्या दरम्यान हे लक्षण दिसून येते. कारण रक्तदाब आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे प्रमाण यावेळी सर्वाधिक असते. छातीत दाब, घट्टपणा, आवळल्यासारखे किंवा जळजळ जाणवू शकते. हे काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते अथवा अधूनमधून पुन्हा पुन्हा जाणवते.
श्वास घेण्यास त्रास होणे
झोपेतून उठल्यावर अचानक धाप लागणे हे हृदयाच्या पंपिंगमध्ये अडथळा आल्याचे लक्षण आहे. छातीत दुखत नसतानाही, लोक विश्रांती घेताना किंवा अंथरुणातून उठतना धाप लागते. धमन्या कडक झाल्याने हृदयाला चालण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यामुळे असे घडते. हे लक्षण महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते.
असामान्य थकवा
रात्रभर हृदयावर पडलेल्या ताणामुळे सकाळी थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. सकाळी उठल्यावर लोकांना नेहमीपेक्षा जास्त थकल्यासारखे वाटते. धक्कादायक म्हणजे कपडे घालण्यासारखी साधी कामे करतानाही त्रास होतो. हृदयाच्या स्नायूंना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे असे घडते. विश्रांती घेऊनही जर हे लक्षण कायम राहिले, तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
मळमळ किंवा अपचन
सकाळची मळमळ, उलट्या किंवा अपचनासारखे पोट फुगणे ही लक्षणे पचनाच्या समस्यांसारखी वाटतात, पण ती हृदयाच्या ताणामुळे व्हेगस नर्व्हला येणाऱ्या जळजळीमुळे उद्भवतात. उपवासानंतर पोटातील आम्ल वाढल्याने ही लक्षणे सर्वाधिक वाढतात. पण हे हार्टअॅटकचे एक लक्षण असू शकते.
थंड घाम
गरम वाटत नसताना किंवा व्यायाम न करता थंड आणि ओलसर घामाने पूर्णपणे भिजून जागे होणे, म्हणजे तुमच्या शरीराची ताण-तणाव प्रणाली अतिसक्रिय झाली आहे. तुमचे शरीर कमकुवत होत असलेल्या हृदयाला चालना देण्यासाठी ॲड्रेनालाईन स्रवते. त्यामुळे फ्लूमुळे येणाऱ्या थंडीसारखा अनुभव येतो. पण हा घाम तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर किंवा छातीवर जमा होतो. हे रक्ताभिसरण कमी झाल्याचे आणि मज्जासंस्थेतील असंतुलनाचे लक्षण आहे.
उभे राहिल्यावर चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे हे रक्तदाब अचानक कमी झाल्याचे लक्षण आहे. रात्रभर सरळ झोपल्याने आणि सकाळी हार्मोन्समध्ये होणाऱ्या वाढीमुळे उठून बसायचं म्हटले तरी त्रास होतो, हे हार्टअटॅकचे लक्षण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.