Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

best exercises after heart attack recovery : हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, कधी सुरू करावेत आणि कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.
best exercises after heart attack recovery
best exercises after heart attack recoverySaam TV Marathi
Published On

What exercises should you do after a heart attack: हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर अथवा हार्ट सर्जरी, बायपास/अँजिओप्लास्टीसारख्या मोठ्या संकटातून बरे झालं म्हणजे रूग्णाने नव्याने आयुष्य सुरू केल्यासारखं आहे. पण सर्जरीनंतर शरीर आणि प्रामुख्याने हृदय पुन्हा पूर्वीसारखे मजबूत करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचं आहे. पण हार्ट सर्जरीनंतर कोणता व्यायाम करावा? कधी सुरू करावा? आणि कोणती काळजी घ्यावी? असे अनेक प्रश्न पडतात. कारण, योग्य व्यायामाने हृदय मजबूत होऊ शकते, तर चुकीच्या पद्धतीमुळे मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो. म्हणूनच वेगाने रिकव्हरी होण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला आहे, जाणून घेऊयात..

शरीराच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणे हृदयाचे स्नायू देखील फक्त व्यायामानेच मजबूत होऊ शकतात. हृदय मजबूत ठेवायचे असेल तर व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यानंतरही व्यायामाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे दुसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यानंतर कोणते व्यायाम केव्हा करावेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

best exercises after heart attack recovery
Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर किती दिवसांनी व्यायाम सुरू करावा?

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर किती दिवसांनी व्यायाम करावा, याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. व्यायाम हा हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारांवरही अवलंबून असतो. तज्ज्ञांच्या मते पहिल्या आठवड्यापासून सहाव्या आठवड्यापर्यंत हालचाल कमी करावी. यामध्ये दोन ते तीन मिनिटे चालण्याचा समावेश आहे. हे प्रमाण हळूहळू वाढवता येते. आठवड्यातून पाच दिवस ३० मिनिटे चालण्याचे लक्ष्य ठेवावे. त्याशिवाय साफसफाई, बागकाम इत्यादींसारखी रोजची शारीरिक कामे १० मिनिटे हळूहळू करावीत.

best exercises after heart attack recovery
Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कोणते व्यायाम करता येतात?

  • हृदयविकाराच्या झटक्यानंतर करण्यासाठी अनेक सोपे व्यायाम आहेत. त्यापैकी योगा, पिलेट्स आणि स्ट्रेचिंगचा समावेश आहे. हृदयावरील उपचारानंतर वरील व्यायाम सुरू करा. पण व्यायामाची वेळ हळूहळू वाढवा.

  • हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यानंतर थोडा-थोडा वेळ चालणे महत्त्वाचे आहे. शरीरावर ताण न देता स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज ५-१० मिनिटे चालण्याने सुरुवात करा.

  • थोड्या वेळासाठी चालण्याशिवाय दररोज श्वासोच्छवासाच्या व्यायाम करावाच. त्यामुळे तणाव कमी होईल आणि हृदय शांत होईल.

  • शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यानंतर १ ते ६ आठवड्यांनी हातांचे आणि खांद्यांचे हलके स्ट्रेचिंग करा. या प्रकारच्या स्ट्रेचिंगमुळे शरीराचा वरचा भाग सक्रिय आणि आरामशीर राहतो.

  • हृदयापासून पायांपर्यंत रक्तप्रवाह योग्य राखण्यासाठी, दररोज टाचा वर उचलण्याच्या व्यायाम करा. त्यामुळे तुमचे पाय मजबूत होतील आणि रक्तप्रवाह वाढेल. व्यायाम करताना तुम्हाला आधाराची गरज वाटल्यास सुरुवातीला खुर्चीचा वापर करा आणि मग हा व्यायाम करा.

  • व्यायाम करताना छातीत दुखणे, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास अडचण येत असेल तर व्यायाम ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

best exercises after heart attack recovery
Marriage tips : मुलगा कितीही श्रीमंत असला तरी 'या' १ सवयीमुळे मुलीचं आयुष्य होईल उद्ध्वस्त; लग्नाआधीच व्हा सावधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com