IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका कायम सुरूच आहे. आरसीबीने त्यांना ९ गडी राखून पराभूत केले. या विजयासह, रजत पाटीदारच्या संघाने गुणतालिकेत आघाडी घेतली.
RCB players celebrate a dominant 9-wicket win over Delhi Capitals in IPL 2026 at Arun Jaitley Stadium.
RCB players celebrate a dominant 9-wicket win over Delhi Capitals in IPL 2026 at Arun Jaitley Stadium.
Published On
Summary
  • आरसीबीचा दिल्लीवर ९ गडी राखून दणदणीत विजय

  • अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य पूर्ण

  • राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी

दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर, दारुण पराभव पत्करावा लागला. आरसीबीने आयपीएल २०२६ मधील आपल्या पराभवाचा बदला घेतला. बेंगरुळुनं नऊ गडी राखून दिल्लीचा हरवलं. विशेष म्हणजे त्याच हंगामात डीसीने बंगळूरू फ्रँचायझीला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पराभूत केले होते.

RCB players celebrate a dominant 9-wicket win over Delhi Capitals in IPL 2026 at Arun Jaitley Stadium.
IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर,आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांची जोडी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी मिळून सात बळी घेतले. तर रसिक सलाम दार आणि सुयश शर्मा यांनीही मोलाचा हातभार लावला. त्यांच्या कामगिरीमुळे आरसीबीने डीसीला १६.३ षटकांत ७५ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. ही या हंगामातील त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरली. भुवनेश्वरने ५ धावा देत ३ विकेट घेतले. जोश हेजलवूडने १२ धावा देत ४ विकेट घेतल्या.

RCB players celebrate a dominant 9-wicket win over Delhi Capitals in IPL 2026 at Arun Jaitley Stadium.
IPL 2026: KKR च्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा MI कोणत्या स्थानी

आरसीबीने ७ व्या षटकात विजय मिळवला

रजत पाटीदारच्या आरसीबीला ७६ धावांचे लक्ष्य सहजरित्या गाठलं. जेकब बेथेल आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी २६ धावा जोडल्या, त्यानंतर काईल जेमिसनने बेथेलला २० धावांवर बाद केलं. परंतु बेंगळूरचा संघ खचला नाही, कारण देवदत्त पडिक्कल (३४) आणि किंग कोहली (२३) यांनी मिळून केवळ ६.३ षटकांत लक्ष्य गाठले. जोश हेझलवूडला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विराट कोहलीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये ९००० धावा पूर्ण

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला. आरसीबी आणि दिल्लीच्या सामन्यात कोहलीने भीम पराक्रम प्रस्थापित केला आहे. जो आजपर्यंत इतर कोणत्याही फलंदाजाने साधलेला नाही. सामन्यात ११ धावा केल्यानंतर विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात ९,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. कोहलीने २७५ सामने खेळून केवळ २६७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com