IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

angkrish raghuvanshi fined by bcci in ipl 2026 : कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याच्यावर बीसीसीआयनं मोठी कारवाई केली आहे. बाउंड्री कुशनवर बॅट मारल्याप्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अंगकृष रघुवंशीवर बीसीसीआयची मोठी कारवाई
angkrish raghuvanshi /Social mediasaam tv
Published On

कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) चा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याच्यावर बीसीसीआयनं मोठी कारवाई केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध काल, रविवारी झालेल्या सामन्यात रघुवंशीनं मोठी चूक केली होती. त्याच्यामुळं बीसीसीआयनं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. कोलकाताचा विकेटकीपर आणि फलंदाज असलेल्या रघुवंशी याला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्डच्या नियमानुसार बाद दिले होते. त्यानंतर डगआऊटमध्ये जाताना त्यानं बाउंड्री कुशनवर बॅट जोरात मारली. त्याच्या या कृत्यामुळं सामन्याचे २० टक्के मानधन कापण्यात आले आहे. तसेच एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. (kkr batter angkrish raghuvanshi penalty against lsg)

अंगकृष रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

आयपीएल आयोजकांकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात रागाच्या भरात केलेलं कृत्य अंगकृष रघुवंशी याला भोवलं आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात आयपीएल खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी रघुवंशीवर कारवाई करण्यात आली आहे. (bcci action on angkrish raghuvanshi boundary cushion incident) सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आला आहे. तसेच एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आले आहे. रघुवंशी याला आचारसंहिता अनुच्छेद २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

रघुवंशीला चूक मान्य

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामन्यात पाचव्या षटकात ही घटना घडली. रघुवंशीला ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्ड म्हणजेच खेळात अडथळा निर्माण केल्यानं त्याला बाद घोषित करण्यात आले होते. अशा प्रकारे बाद दिल्यामुळे रघुवंशीचा पारा चढला. मैदानातून बाहेर जाताना त्यानं रागाच्या भरात आपल्या हातातील बॅट बाउंड्री कुशनवर मारली. तसेच हेल्मेट काढून डगआऊटमध्ये फेकलं. रघुवंशीनं आपली चूक मान्य केली. मॅच रेफरीद्वारे दिलेली शिक्षा मान्य केली. त्यामुळे या प्रकरणावर पुढे कोणतीही सुनावणी होणार नाही.

अंगकृष रघुवंशीवर बीसीसीआयची मोठी कारवाई
LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

आयपीएलच्या इतिहासात चौथी घटना

आयपीएलच्या इतिहासात ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्डची चौथी घटना घडली आहे. रघुवंशीला बाद देण्यात आलं होतं. जाणूनबुजून रघुवंशीनं धावताना दिशा बदलली नाही असं सुरुवातीला वाटत होतं. जर फलंदाजाला माघारी जायचं असेल तर, थोडी दिशा बदलून तो माघारी फिरू शकतो. त्यामुळे लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने अपील केलं. त्यानं जाणूनबुजून दिशा बदलली, असं थर्ड अंपायरला दिसून आलं. त्यामुळे त्याला बाद देण्यात आलं. त्यामुळे रागाच्या भरात रघुवंशीनं सुरुवातीला बाउंड्री लाइनवर बॅट मारली आणि त्यानंतर आपलं हेल्मेट डगआऊटमध्ये फेकलं.

अंगकृष रघुवंशीवर बीसीसीआयची मोठी कारवाई
IPL 2026: KKR च्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा MI कोणत्या स्थानी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com