IPL 2026: KKR च्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा फटका; पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा MI कोणत्या स्थानी

IPL 2026 Points Table after LSG vs KKR Match: आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने एलएसजीचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. रिंकू सिंग आणि सुनील नरेन यांच्या शानदार कामगिरीमुळे केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये झेप घेतली तर एलएसजी तळाशी घसरली.
IPL 2026 Points Table after LSG vs KKR Match
IPL 2026 Points Table after LSG vs KKR MatchSAAM TV
Published On

आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना एक रोमांचक सामना ठरला. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. या सामन्यात रिंकू सिंग आणि सुनील नरेन यांच्या कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला.

या सामन्याच्या निकालामुळे आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. सामन्याच्या निकालामुळे पॉईंट्स टेबलच्या पहिल्या चार टीम्समध्ये बदल झाला नसला तरी तळाच्या टीम्समध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. या विजयामुळे केकेआरला २ क्रमांक वर झेप घेता आली आहे, तर पराभवामुळे एलएसजी तळाशी गेली आहे.

केकेआरची २ स्थानांची झेप

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी होती. मात्र, त्या सामन्यानंतर ते आता पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. एलएसजीवरील विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स १० व्या स्थानावरून ८ व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी पाच सामने गमावल्यानंतर, केकेआरचा हा त्यांच्या ८ व्या सामन्यातील दुसरा विजय होता, तर एक सामना रद्द झाल्याने ८ सामन्यांनंतर केकेआरकडे ५ गुण असून त्यांचं रनरेट -०.७५१ आहे.

रिंकू आणि नरेनची कमाल

केकेआरचे दोन खेळाडू, रिंकू सिंग आणि सुनील नरेन, यांनी केकेआरला १०व्या स्थानावरून ८व्या स्थानावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एलएसजीविरुद्ध रिंकू सिंगने आपल्या फलंदाजी आणि फिल्डींग करत उत्कृष्ट कामगिरी केली, तर सुनील नरेनची सुपर ओव्हरमधील गोलंदाजी उत्तम होती.

रिंकू सिंगने ५१ चेंडूंमध्ये नाबाद ८३ रन्स केले. याशिवाय त्याने कालच्या सामन्यात पाच कॅचही घेतले. त्यापैकी एक कॅच त्याने सुपर ओव्हरमध्ये घेतला. त्याने सामन्यात ४ ओव्हर्समध्ये २३ रन्स देऊन १ विकेट घेतली. सुपर ओव्हरमधील सर्वात उत्तम कामगिरी म्हणजे त्याने पहिल्या तीन चेंडूंमध्येच एलएसजीच्या दोन्ही विकेट्स घेतल्या.

पंतची टीम तळाशी

एलएसजीला केवळ पराभवच पत्करावा लागला नाही, तर ते आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलमध्ये १० व्या स्थानावर घसरले आहेत. केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी एलएसजी पॉईंट्स टेबलमध्ये ८ व्या स्थानावर होती. आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये २ विजय आणि ६ पराभवांसह एलएसजीकडे ४ गुण असून त्यांचा रनरेट -१.१०६ आहे.

मुंबईच्या टीमला फटका

कोलकात्याच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या टीमला मोठा फटका बसला आहे. कोलकाता विरुद्ध लखनऊच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सची टीम ८ व्या स्थानी होती. मात्र, केकेआर २ स्थानी पुढे गेल्याने मुंबईची ९ व्या स्थानी घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com