

सचिन तेंडुलकर होणार सासरा
लेक अर्जुन तेंडुलकर सानिया चांडोकशी लग्न करणार
५ मार्चला पार पडणार विवाहसोहळा
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न आहे. अर्जुन सानिया चांडोकशी लग्न करणार आहे. ५ मार्चला म्हणजे उद्या लग्न होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो समोर आले आहेत. नुकताच मेहंदी समारंभाचा व्हिडिओ समोर आला आहे.
अर्जुन तेंडुलकरचा मेहंदी सोहळा (Arjun Tendulkar Mehndi Ceremony)
अर्जुन तेंडुलकरच्या मेहंदी समारंभाचे (Arjun Tendulkar Mehendi Ceremony) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये संपूर्ण तेंडुलकर कुटुंब छान दिसत आहेत. त्यांनी मीडियासमोर येऊन पोझ दिल्या आहेत. यामध्ये अर्जुन तेंडुलकरने शेरवानी घातली आहे. तर होणारी पत्नी सानिया चांडोकने लेहंगा घातलेला दिसत आहे. याचसोबत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा तेंडुलकरदेखील (Sara Tendulkar) खूप सुंदर दिसत आहे. (Sachin Tendulkar Son Marriage)
अर्जुन आणि सानियाचा मेहंदी सोहळा गॅलप्स रेस्टॉरंटमध्ये पार पडला. त्यांच्या प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये होता. त्याचे फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान, लग्न कुठे होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अर्जुन तेंडुलकरच्या मेहंदी सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. राज ठाकरे सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर प्री वेडिंग फंक्शनला युवराज सिंह पत्नी हेझल कीचसोबत उपस्थित होता. इरफान पठाण, हरभजन सिंह, झहीर खानने पत्नीसोबत उपस्थित राहिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.