
IPL 2025 मध्ये शुबमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स सध्याचे टेबल टॉपर्स आहेत. शुबमनसह हैदराबादच्या अभिषेक शर्मादेखील यंदाच्या आयपीएलमध्ये चमकला आहे. पंजाब विरुद्ध खेळताना त्याने ५५ चेंडूंमध्ये १४१ धावा करत अनेक विक्रम मोडले. हे दोघे युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. 'शुबमन-अभिषेक यांच्याप्रमाणे अर्जुन तेंडुलकरने देखील युवराजकडून मार्गदर्शन घेतले तर, तो पुढचा ख्रिस गेल बनेल', असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी केले आहे.
'अर्जुनने माझ्याकडून प्रशिक्षण घ्यावे, मी त्याला दर्जेदार खेळाडू बनवेन' असे योगराज सिंग म्हणाले होते. आता त्यांनी अर्जुनने युवराज सिंगकडून मार्गदर्शन घ्यायला हवे असे विधान केले आहे. अर्जुनकडे आक्रमक फलंदाजी करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. जर त्याला युवराजने मार्गदर्शन केले, तर तो पुढचा ख्रिस गेल होऊ शकतो' असे योगराज यांनी म्हटले आहे.
'माझ्या मते, अर्जुनने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. जर युवराजने सचिनच्या मुलाला केवळ तीन महिन्यांसाठी आपल्या मार्गदर्शनाखाली घेतले, तर तो भविष्यात 'पुढचा ख्रिस गेल' म्हणून ओळखला जाऊ शकतो', असा दावा योगराज सिंग यांनी केला आहे. त्यांच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपये खर्च करुन संघात सामील केले. पण त्याला अजूनही खेळायची संधी मिळालेली नाही. सध्या अर्जुन तेंडुलकर मुंबईऐवजी गोवा संघातून खेळतो आहे. गोव्यासाठी खेळताना त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकले होते. विजय हजारे ट्रॉफीतही त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी करत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.