RCB VS RR : डोळे मिटले, प्रार्थना केली; तरीही रजत पाटीदारने टॉस हरला, आता सामनाही...? काय सांगतात आधीचे आकडे

RCB VS RR IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यामध्ये राजस्थानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RCB VS RR IPL 2025
RCB VS RR IPL 2025X
Published On

RCB VS RR Match : चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थानच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. टॉसनंतर दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने रियान परागकडे आजच्या सामन्याचे नेतृत्त्व करणार आहे. रियान पराग आणि रजत पाटीदार टॉससाठी एकत्र आले. टॉस जिंकण्यासाठी रजत पाटीदारने डोळे मिटून देवाकडे प्रार्थना केली. त्याच्याकडे पाहून रियान पराग आणि बाकीचे हसू लागले. प्रार्थना करुनही टॉसमध्ये रजत पाटीदारला अपयश मिळाले.

RCB VS RR IPL 2025
India vs Pakistan सामन्याचा चेंडू आता ICC कडे; बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं- आमच्या हातात नाही...

आयपीएल २०२५ मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर जेव्हा-जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामने खेळला आहे, तेव्हा त्यांना बंगळुरूचा पराभव झाला आहे. या सामन्यात बंगळुरूने टॉस गमावला होता. तेव्हा आजच्या सामन्यात घरच्या स्टेडियमवर सामना जिंकण्यासाठी आधी टॉस जिंकावा असे रजत पाटीदारच्या मनात होते. टॉस गमावल्याने बंगळुरूच्या हातून सामना देखील निसटणार की, आरसीबी चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RCB VS RR IPL 2025
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने अंपायरला विकत घेतलं? 'या' ३ निर्णयांवरुन उपस्थित केली जातेय शंका

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ :-

यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फजलहक फारुकी, तुषार देशपांडे, संदीप शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची प्लेईंग ११ :-

फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

RCB VS RR IPL 2025
Hardik Pandya : आयपीएल मॅचमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली, हार्दिक पंड्या का होतोय ट्रोल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com