Hardik Pandya : आयपीएल मॅचमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली, हार्दिक पंड्या का होतोय ट्रोल?

SRH VS MI : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कालच्या हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यापूर्वी मिनिटभर मौन पाळले गेले. त्या दरम्यान हार्दिक पंड्या हसत होता, असे काहीजण म्हणत आहेत.
hardik pandya
hardik pandyaX
Published On

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. यात २८ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कालच्या आयपीएल सामन्यात काही बदल करण्यात आले.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या आयपीएलच्या ४१ व्या सामन्यात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू, सपोर्टिंग स्टाफ, अंपायर्स यांच्यासह स्टेडियममध्ये जमलेल्या क्रिकेटच्या चाहत्यांनी मिनिटभर मौन पाळले. याशिवाय सामन्यादरम्यान डीजे, चिअरलीडर्स, आतषबाजी रद्द करण्यात आली.

hardik pandya
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने अंपायरला विकत घेतलं? 'या' ३ निर्णयांवरुन उपस्थित केली जातेय शंका

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या कालच्या सामन्यापासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काल सामना सुरु श्रद्धांजली वाहताना ज्या वेळेस सर्वजण मौन पाळत होते, तेव्हा हार्दिक पंड्या हसत होता, चुळबूळ करत होता असे नेटकऱ्यांचे मत आहे. यावरुन पंड्यावर अनेकजण टीका करत आहेत. सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला ट्रोल करणाऱ्या अनेक पोस्ट्स पाहायला मिळत आहेत.

hardik pandya
Pahalgam Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पाकिस्तानच्या खेळाडूला पाकिस्तानवरच संशय; एका पोस्टने उडाली खळबळ

दरम्यान हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात काल मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर मात केली. हा मुंबईचा सलग चौथा विजय आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या क्रमावर उडी मारली आहे. रविवारी, २७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.

hardik pandya
IPL 2025 : अरे थांब जरा, तेही पैसे घेतात..! इशान किशनच्या वादग्रस्त विकेटवर वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com