Pahalgam Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पाकिस्तानच्या खेळाडूला पाकिस्तानवरच संशय; एका पोस्टने उडाली खळबळ

Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला. अनेकजण त्यात जखमी झाले. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने या हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist AttackX
Published On

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लष्कर-ए-तयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंटने हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. जगभरातून पहलगाम हल्ल्याचा निषेध होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून दानिश कानेरियाने देखील या भ्याड हल्ल्यावर राग व्यक्त केला आहे.

पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या मृतकांना त्याने श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप देखील केले. 'जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा काही संबंध नसेल, तर पंतप्रधान शहबाज शरीफ अजूनही शांत का आहेत? त्यांनी या हल्ल्याचा अजूनही निषेध का केला नाही?' असे दानिश कनेरिया म्हटले आहे.

Pahalgam Terrorist Attack
SRH VS MI Fixing : अंपायरचं कन्फुजन, इशान किशनची विकेट अन् मॅच फिक्सिंगच्या चर्चांना सुरूवात

'पाकिस्तानचे सैन्य अचानक हाय अलर्टवर का आहे? तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात, त्यांचे पालनपोषण करत आहात. हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे', असे म्हणत दानिशने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर टीका केली आहे. दानिश कानेरियाच्या या एक्स पोस्टची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Attack : निष्पाप भारतीयांची हत्या करणे हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, पहलगाम हल्ल्यावर संतापला माजी क्रिकेटपटू

दानिश कानेरिया हा पाकिस्तान क्रिकेट संघातील उकृष्ट फिरकीपटूंपैकी एक होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. तो पाकिस्तान संघातील मोजक्या हिंदू क्रिकेटपटूंपैकी एक आहे. हिंदू असल्याने अनेकदा पाकिस्तान क्रिकेटमध्ये संघात त्रास झाला असल्याचे कानेरियाने म्हटले आहे. दानिश कानेरिया त्याच्या कुटुंबासह सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहे.

Pahalgam Terrorist Attack
Gautam Gambhir: पहलगाम हल्ल्यानंतर गौतम गंभीरला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com