Gautam Gambhir: पहलगाम हल्ल्यानंतर गौतम गंभीरला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

Gautam Gambhir death threats: मंगळवारी काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. संपूर्ण देश या घटनेने हादरला असताना टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळालीये.
Gautam Gambhir death threats
Gautam Gambhir death threatssaam tv
Published On

मंगळवारी काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. अशातच टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ISIS काश्मिरकडून ही धमकी मिळाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट टीमचा हेड कोचला धमकी मिळाल्यानंतर त्याने दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा मागितली आहे.

Gautam Gambhir death threats
Video: क्रिकेट नव्हे तर कुस्तीचा आखाडा! भर मैदानात गोलंदाजाने आपल्याच खेळाडूचं थोबाड फोडलं; रक्तबंबाळ झाला खेळाडू

मेल करून दिली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला दहशतवादी संघटना ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरने दिल्ली पोलिसांना संपर्क करत एफआयआर देखील दाखल केली आहे. यावेळी त्याने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षा मागितली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा गंभीरकडून निषेध

मंगळवारी दुपारी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा गंभीरने कडक शब्दात निषेध केला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत भारत या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देईल असं त्याने सोशल मीडियाद्वारे म्हटलं होतं.

Gautam Gambhir death threats
SRH VS MI Fixing : अंपायरचं कन्फुजन, इशान किशनची विकेट अन् मॅच फिक्सिंगच्या चर्चांना सुरूवात

दिल्ली पोलिसांनी हे प्रकरणं गांभीर्याने घेतलं असून याची तपासणी सुरु आहे. गंभीरला धमकीचे मेल करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस हे सायबर क्राईच्या टीमसोबत ज्याने मेल पाठवला आहे, त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. गंभीरला एका अनोखळी मेल आयडीवरून हा मेल आला आहे. ज्यामध्ये केवळ तीन शब्द लिहिण्यात आलेत. I kill u असं या मेलमध्ये लिहिण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com