
आयपीएल २०२५ मधला ४१ वा सामना रंगला आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १३ धावांवर मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या ४ महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केले. नवव्या ओव्हरपर्यंत हैदराबादची धावसंख्या ३५/५ इतकी होती. हेनरिच क्लासेन आणि अभिनव मनोहर यांच्या महत्त्वपूर्ण १०१ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादची धावसंख्या १४३ पर्यंत गेली. पण या सामन्यात इशान किशनच्या विकेटमुळे सोशल मीडियाव मॅच फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आले.
नेमकं काय घडलं?
तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चहरने टाकलेल्या चेंडूवर इशान किशनने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या बाजूने थेट विकेटकिपरकडे गेला. सुरुवातीला कुणीच अपील केले नाही. हार्दिकने अपील केल्यानंतर अंपायर्संनी वाइड बॉलचा कॉल दिला. पण इशान किशन क्रीज सोडून जाऊ लागल्याने दीपक चहरने अपील केली, तेव्हा अंपायरने आउटची खून दाखवली. किशन माघारी परतला. तेव्हा रिप्लेमध्ये चेंडूला बॅटला स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या गोंधळामुळे आणि आउट नसतानाही इशान तंबूत परतल्याने मॅच फिक्सिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावर फिक्सिंगचे मीम्स व्हायरल झाले.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.