
SRH VS MI : हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यातील इशान किशनच्या विकेटची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. इशान किशन कालच्या सामन्यात १ धाव करुन माघारी परतला होता. रिव्ह्यूचा ऑप्शन असतानाही त्याने डीआरएस घेतला नाही. अंपायर कॉलच्या आधीच इशान क्रीज सोडून डगआउटकडे निघाला. त्यानंतर अंपायरने इशान किशन आउट आहे असा कॉल दिला. पण डीआरएसमध्ये तो आउट नव्हता हे स्पष्ट झाले.
इशान किशनच्या वादग्रस्त विकेट प्रकरणावर वीरेंद्र सेहवाग, नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेकांनी भाष्य केले आहे. मुंबईच्या खेळाडूंनी अपील न करताही आउटचा कॉल दिल्याबद्दल सिद्धूने अंपायर्संना दोषी ठरवले. 'प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी अपील न करता अंपायर्संनी एखाद्या खेळाडूला आउट घोषित करताना पाहिले आहे का?' असा सवाल नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला आहे.
वीरेंद्र सेहवागने या विकेट प्रकरणावरुन इशान किशनवर टीका केली. इशान किशनने क्रीज सोडून चूक केली. त्याने अंपायरच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. जर तो क्रीजवर थांबला असता किंवा त्याने रिव्ह्यू घेतला असता, तर बॅटचा चेंडूला स्पर्श झालाच नाहीये हे त्याला समजले असते, असे वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटले.
'कधीकधी अशा वेळी मेंदू काम करेनासा होतो. त्यावेळी इशानच्या मेंदूने काम करणे थांबवले असावे. पण अरे थांब जरा, अंपायरला आउट तर देऊ देत. अंपायर देखील पैसे घेत आहेत, त्यांना त्यांचे काम करु द्यायचे ना.. मला हा प्रामाणिकपणा समजला नाही. जर तेथे बॅटची एज लागली असती तर ते समजण्यासारखे होते. पण तो आउट नव्हता, अंपायर्सनी निकाल दिला नव्हता, त्यात तुम्ही मैदान सोडून जाता.. त्यामुळे अंपायर देखील गोंधळात पडले. रिकी पाँटिंग म्हणायचा, माझे काम फलंदाजी करणे आहे. आउटचा कॉल देण्याचे काम अंपायरचे आहे' असे वक्तव्य वीरेंद्र सेहवाग यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.