Shreya Maskar
प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड लवकरच लग्न बंधानत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. 'मुरांबा' मालिकेतून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला.
सिद्धार्थ खिरीड डॉ. मैथिली भोसेकरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मैथिली ही सौंदर्यवती आहे. मैथिली भोसेकरने 'मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट 2022-2023' हा किताब जिंकला आहे. तसेच पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. ती मॉडेलिंग क्षेत्रातही विशेष सक्रिय आहे.
नुकतीच मैथिलीच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहे. त्यांनी फोटोंना "रंग-ए-मेहंदी, रंग-ए-मोहब्बत" असे रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
मेहंदी सोहळ्यासाठी दोघांनी खूपच खास लूक केला होता. मैथिलीने जांभळ्या रंगाचा शरारा टाइप भरजरी ड्रेस परिधान केला होता. हातावर मेहंदी, मॅचिंग ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप, केसांची सुंदर वेणी बांधून तिने हा लूक पूर्ण केला.
मेहंदी सोहळ्यासाठी सिद्धार्थने जांभळ्या रंगाची सुंदर नक्षीकाम असलेला कुर्ता परिधान केला होता. दोघे एकत्र खूपच आनंदी आणि क्यूट दिसत होते. मेहंदीचे रोमँटिक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
सिद्धार्थ आणि मैथिली 23 जानेवारी 2026 ला लग्न बंधनात अडकणार आहे. अलिकडेच दोघांनी भन्नाट स्टाइलमध्ये प्री-वेडिंग शूट देखील केले. मैथिली आणि सिद्धार्थने कॉफी शॉपबाहेर हटके फोटोशूट केले आहे.
सिद्धार्थ खिरीडने गेल्यावर्षी मैथिलीला गोव्यात फिल्मी स्टाइल प्रपोज केले होते. त्याचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला. #sidkihuimai हे त्यांचे हॅशटॅगही खूप व्हायरल होत आहे.
'मुलगी झाली हो', 'फ्रेशर्स', 'जाऊबाई जोरात', 'हृदयी प्रीत जागते', 'मुरांबा' अशा मालिकांमधून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे.