Rohit Sharma : रोहित शर्माचा मराठमोळा ठसका, हास्यजत्रेच्या टीमसोबत मारल्या गप्पा| VIDEO

Maharashtrachi Hasyajatra Team Meets Indian Cricketer Rohit Sharma : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार नुकतेच क्रिकेटर रोहित शर्माला भेटले. ज्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यात रोहित कलाकारांशी मराठीत गप्पा मारताना दिसत आहे.
Maharashtrachi Hasyajatra Team Meets Indian Cricketer Rohit Sharma
Rohit SharmaSaam tv
Published On
Summary

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम रोहित शर्माला भेटली.

रोहित शर्माने कलाकारांशी मराठीत संवाद साधला.

रोहितच्या या कृतीने सर्वांचे मन जिंकले.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचे कलाकार कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजवर त्यांनी जगाला खळखळवून हसवले आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्माला भेटलेली पाहायला मिळत आहे. रोहित शर्माने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीम सोबत मराठीत गप्पा मारल्या आहेत.

रोहित शर्मा यापूर्वी देखील अनेक वेळा मराठीत बोलला आहे. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र हा व्हिडीओ खूप खास आहे. कारण रोहितने मराठी भाषेविषयी केलेले वक्तव्याने चाहते भारावून गेले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांसाठी ही फॅन मूमेंट खूप खास ठरली. 'थेट तुमच्या घरातून' नाटकात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार काम करत आहे. तेव्हा नम्रता संभेराव , प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद यांना रोहित शर्मा भेटला. ही भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय देसाई यांच्यामुळे घडून आली. कलाकारांनी शेवटी रोहित शर्मासोबत फोटोही काढले.

रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?

  • रोहित शर्मा : नमस्कार!

  • नम्रता संभेराव : ओ माय गॉड... कसे आहात तुम्ही?

  • रोहित शर्मा : मजेत...

  • नम्रता संभेराव : आम्हाला खूप छान वाटले तुम्हाला भेटून.. मराठीत बोलते, कारण मी तुमचे मराठीत बोललेल व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आहेत...

  • रोहित शर्मा : हो मी मराठी बोलतो...मुंबईमध्ये राहतो मराठी तर येणारच

  • सगळे जण : अरे वा...थँक्यू!

चाहत्यांच्या कमेंट्स

रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते, प्रेक्षक, कलाकार भरभरून प्रेम देताना दिसत आहे. कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. "आपला मराठी माणूस रोहित भाऊ", "आपला कर्णधार", "मुंबईचा राजा रोहित शर्मा" , "आपला माणूस", "महाराष्ट्रचे स्टार मराठीचा अभिमान", "जय महाराष्ट्र, मुंब चा राजा" , " क्रिकेटच्या दुनियेतला हिटमॅन", "हिटमॅन मुंबई IND टीम Real Hero मुंबईचा राजा माणूस... ", "तुम्ही खूपच भाग्यवान आहात, खूप सार प्रेम..." ," रो भाई " अशा भरभरून कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Team Meets Indian Cricketer Rohit Sharma
Bigg Boss Marathi 6 : 9 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; भाऊच्या धक्क्यावर कोण घेणार घराचा निरोप? 'हे' सदस्य Danger Zone मध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com