Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Rohit Sharma Viral Post : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ उडालीय. इंस्टाग्राम स्टोरीमुळे निवृत्तीच्या अटकळांना सुरुवात झाली आहे.
Rohit Sharma Viral Post
Rohit Sharma in the news due to Instagram storysaam tv
Published On
Summary
  • रोहित शर्माच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडालीय.

  • “New role coming” या ओळींमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • २०२७ विश्वचषकानंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर केल अशी शक्यता आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा काही दिवसांपासून विश्रांती घेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेतील हिटमॅनच्या कामगिरीमुळे तो अजूनही चर्चेत आलाय. आता टी२० मालिकेदरम्यान त्याने चाहत्यांच्या हृदयाची धकधक वाढवलीय. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडालीय. हिटमॅन रोहितनं एक सस्पेन्स वाढणारी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केलीय. ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय.

Rohit Sharma Viral Post
Fact Check: सिराजचं क्रिकेटच्या मैदानात नमाज पठण? कोहली, रोहित,गिलने बनवला व्हिडिओ?

एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा

रोहित शर्मा आणि महान फलंदाज विराट कोहली यांनी इन्स्टाग्राम स्टोरीजद्वारे त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली. तेव्हापासून चाहते त्याची पोस्ट पाहून चिंतेत पडत असतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतात. त्या दोघांनी टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. ते दोघेही २०२७ चा विश्वचषकात खेळताना दिसतील अशी, आशा चाहत्यांना आहे. तो क्रिकेटच्या मैदानात दिसावं अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना आहे. मात्र होणाऱ्या चर्चा पाहता या वर्ल्डकपनंतरच रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीची घोषणा करेल असं वाटत आहे. याचदरम्यान रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर "न्यू रोल कमिंग, उद्या दुपारी मोठा खुलासा." अशी स्टोरी पोस्ट केली आहे.

Rohit Sharma Viral Post
रोहित शर्मा चाहत्यांवर भडकला, थेट इशाराच दिला; 'हिटमॅन'सोबत नेमकं काय घडलं? VIDEO

गेल्या वर्षी केली होती निवृत्तीची घोषणा

रोहित शर्माने गेल्या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांनी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दोघांचीही निवृत्तीच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती. आज रोहित शर्माने इस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे ३० जानेवारी रोजी काय होईल, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा एक प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने २०२३ च्या विश्वचषकाबद्दल भाष्य केलंय.

रोहित शर्माने वर्ल्डकपच्या प्रोमोमध्ये म्हटलंय की, त्यांनी आपला १९ नोव्हेंबरचा दिवस खराब केला. त्यांच्यासाठी ही एक चांगली भेट असेल. स्टार्क, कमिन्स, हेझलवूड, मॅक्सवेल, स्टोइनिस, झांपा - माझी योजना त्या सर्वांवर हल्ला करण्याचा होता." एकीकडे, वारा इतका जोरदार होता की चेंडू बॅटला स्पर्श करताच निघून जात होता. जेव्हा तुम्ही वाईड आउट करता तेव्हा तुम्ही फलंदाजाला बाद करण्यासाठी नाही तर बचावण्यासाठी पाहता. माझ्या मते, मी येथेच अर्धी लढाई जिंकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com