रोहित शर्मा चाहत्यांवर भडकला, थेट इशाराच दिला; 'हिटमॅन'सोबत नेमकं काय घडलं? VIDEO

Rohit Sharma viral video : रोहित शर्मा त्यांच्या लहान चाहत्यांवर चांगलाच भडकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma viral videoSaam tv
Published On
Summary

रोहित शर्माच्या चाहत्यांचा बेशिस्तपणा

रोहित शर्मा चाहत्यांवर भडकला

कारमध्ये बसलेल्या रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

भारतातील अनेकांसाठी क्रिकेट हा धर्मच झाला आहे. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंचे जगभरात हजारोंचा चाहता वर्ग आहे. या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडेपिसे होतात. मैदानावर सुरु असलेल्या सामन्यादरम्यानही काही चाहते आवडत्या क्रिकेटपटूला भेटायला जातात. आपल्या आवडीच्या क्रिकेटपटूसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अशाच एका चाहत्याचं कृत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी चाहत्याने थेट रोहित शर्माचा हातच पकडून ठेवला. त्यामुळे रोहित शर्माला चांगलाच राग अनावर झाला.

रोहित शर्माच्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माला त्याच्या चाहत्याचा बेशिस्तपणा अनुभवयास मिळाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लहान मुलाने कारमध्ये बसलेल्या रोहित शर्माचा फोटोसाठी हात पकडला. त्यानंतर रोहित शर्मा चांगलाच भडकला.

Rohit Sharma
Makar Sankranti Date : १४ की १५ जानेवारी, मकर संक्रात नेमकी कधी? तारीख अन् शुभ मुहूर्त एका क्लिकवर

नेमकं काय घडलं?

रोहित शर्मा हा त्याच्या कुटुंबीयांसोबत कारमध्ये बसला होता. रोहित शर्मा हा त्याच्या बायको आणि मुलांसोबत कारमध्ये होता. त्याची कार एका ठिकाणी थांबली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कारजवळ घोळका घातला. यावेळी एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी रोहितचा हात पकडला. चाहत्याच्या कृत्याने भडकलेल्या रोहित शर्माने या चाहत्याला खडसावत कारच्या खिडकीची काच बंद केली. काच बंद करताना चाहत्याला पुढे असे करू नको, असा सल्ला देखील दिला. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rohit Sharma
मॅरेथॉनमध्ये जिंकली, पण आयुष्याच्या शर्यतीत हरली; दहावीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू

तत्पूर्वी, रोहित शर्मा यंदा ११ जानेवारी रोजी मैदानात खेळताना दिसेल. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन सामन्यांची मालिका आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसेल. दोन्ही स्टार खेळाडू आता फक्त टी२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com