देशातील टॉप १० श्रीमंत शहरे! मुंबई पहिल्या क्रमांकावर, तर पुण्याने पटकावला 'हा' क्रमांक, वाचा यादी

India richest cities, Mumbai GDP ranking : जीडीपीच्या आधारे भारतातील टॉप १० श्रीमंत शहरांची यादी जाहीर झाली असून मुंबईने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली एनसीआर दुसऱ्या क्रमांकावर तर पुणे सातव्या स्थानावर पोहोचले आहे. संपूर्ण यादी आणि आकडे जाणून घ्या.
Top 10 Richest Cities in India by GDP
Top 10 Richest Cities in India by GDP
Published On

list of richest cities in India by GDP : मुंबई, बंगळुरू अन् दिल्लीसारख्या मोठ्या शहरामुळेच देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. सर्वात मोठी शहरे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. जीडीपी आधारीत देशातील सर्वात श्रीमंत १० शहरांची (Top 10 Richest Cities in India by GDP) यादी समोर आलेली आहे. यामध्ये मुंबईने अव्वल क्रमांक पटकावलाय. तर दिल्ली एनसीआर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही यादी प्रमुख शहरांच्या अंदाजे वार्षिक जीडीपीच्या आधारे तयार केलेली आहे. व्यावसाय, औद्योगिक उत्पादन, सेवा क्षेत्रातील ताकद आणि दरवर्षी निर्माण होणारी एकूण आर्थिक उलाढाल यावर यावर ही यादी तयार केली जाते. या यादीत पुणे शहरानेही क्रमांक पटकावला आहे. mypunepulse या संकेतस्थळाने याबाबतची बातमी दिलेली आहे. (Top 10 Richest Cities in India by GDP)

मुंबईचे वर्चस्व कायम -

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने या यादीत आपले अव्वल स्थान कायम ठेवलेय. मुंबईची अर्थव्यवस्था सुमारे २७.८० लाख कोटी रुपयांची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या उपस्थितीमुळे मायानगरीची आर्थिक ताकद कायम राहते. प्रमुख बँका, विमा कंपन्या, कॉर्पोरेट मुख्यालये, बॉलिवूड आणि भारतातील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक मुंबईतच आहे. त्यामुळे हे देशातील सर्वात श्रीमंत शहर आहे.

Top 10 Richest Cities in India by GDP
Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

दिल्लीकडून मुंबईला टक्कर -

मुंबईनंतर देशात सर्वाधिक आर्थिक उत्पन्न राजधानी दिल्लीमध्ये होतेय. दिल्ली-एनसीआर सर्वाधिक जीडीपी असणाऱ्या शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीची अर्थव्यवस्था अंदाजे २६.३३ लाख कोटी रुपयांची आहे. केंद्र सरकारची कार्यालये तसेच गुरुग्राम आणि नोएडामधील प्रमुख कॉर्पोरेट आणि आयटी हब असल्याने दिल्लीला फायदा झाला.

Top 10 Richest Cities in India by GDP
Sunetra Pawar : त्या ३५ आमदारांचाच सुनेत्रा पवारांना पाठिंबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचंय?

भारताच्या सिलिकॉन व्हॅलीची स्थिती काय ?

सर्वाधिक जीडीपी असणाऱ्या शहरात कोलकाता तिसऱ्या तर बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकात्याचा १३.४५ लाख कोटी रुपयांचा अंदाजे जीडीपी आहे. तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहराची अर्थव्यवस्था ९.१३ ते ११.०४ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ७.०५ लाख कोटी रुपयांच्या अंदाजे अर्थव्यवस्थेसह चेन्नई पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे . तर आयटी कॉरिडॉर , औषध उद्योग आणि बायोटेक इकोसिस्टममुळे हैदराबाद ६.७० लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह सहाव्या क्रमांकावर आहे .

Top 10 Richest Cities in India by GDP
Mantralaya Bribery Case: मंत्रिपद कुणाला द्यायचं अन् कुणाचं काढायचं? मुख्यमंत्री ठरवतील; राजीनाम्यावर झिरवाळ स्पष्टच बोलले

पुण्यानेही बाजी मारली -

देशाच्या टॉप १० श्रीमंत शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे. मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर पुण्याने ६.१८ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह सातवे स्थान पटकावले आहे. शैक्षणिक संस्था, आयटी क्षेत्र, ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी यावर पुण्याचा जीडीपी अवलंबून आहे. गुजरातमधील अहमदाबाद ६.०९ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह आठव्या क्रमांकावर आहे. ५.३० लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह सुरत नवव्या आणि विशाखापट्टणम दहाव्या स्थानावर आहे.

Top 10 Richest Cities in India by GDP
Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी, स्पष्ट शब्दातच म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com