Bigg Boss Marathi 6 : 9 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; भाऊच्या धक्क्यावर कोण घेणार घराचा निरोप? 'हे' सदस्य Danger Zone मध्ये

Bigg Boss Marathi 6 Nomination : 'बिग बॉस मराठी 6'मध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. या आठवड्यात एकूण 9 सदस्य नॉमिनेट झाले आहे. त्यामुळे घरात चांगलाच ड्रामा रंगला आहे.
Bigg Boss Marathi 6 Nomination
Bigg Boss Marathi 6 saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात 9 सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होतात.

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला आहे.

बिग बॉसच्या घरात विशाल रुचितावरच्या प्रेमाची कबुली देतो.

बिग बॉसच्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्य पाण्याची बादली सदस्यांवर ओतून त्यांना नॉमिनेट करत होते. नॉमिनेशन टास्कमध्ये नेहमी प्रमाणे घरातील सदस्यांमध्ये वाद होतात. प्रत्येक जण आरोप आणि प्रत्यारोपांचा खेळ खेळतात. विशाल दीपालीला टार्गेट करतो. घरात राखी सर्वांची मजा घेताना दिसते. तर राखी आणि रुचितामध्ये तुफान भांडणे होतात. बिग बॉसच्या घरात एकूण आता 9 सदस्य नॉनिमेट झाले आहेत. त्यांची यादी जाणू घेऊयात.

नॉमिनेशन टास्क

  • रोशन - राकेश आणि प्रभूला नॉमिनेट करतो

  • तन्वी - प्राजक्ता आणि रुचिताला नॉमिनेट करते

  • सचिन - अनुश्री आणि विशालला नॉमिनेट करतो

  • प्रभू - सचिन आणि रुचिताला नॉमिनेट करतो

  • रुचिता - प्रभू आणि दीपालीला नॉमिनेट करते

  • राखी - रोशन आणि सागरला नॉमिनेट करते

  • विशाल - दीपाली, आणि प्रभूला नॉमिनेट करतो

नॉमिनेट सदस्यांची नावे

  1. सचिन कुमावत

  2. प्रभू शेळके

  3. प्राजक्ता शुक्रे

  4. दीपाली सय्यद

  5. रुचिता जामदार

  6. राकेश बापट

  7. अनुश्री माने

  8. रोशन भजनकर

  9. सागर कारंडे

कॅप्टन्सी टास्क

टोळीतले तीन सदस्य नॉमिनेट होतात. त्यामुळे रुचिता आणि विशालमध्ये शाब्दिक चकमक होते. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगतो. कॅप्टन्सी टास्कमध्ये राजकन्या तंटावतीची वेणी सोडवायची असते. या टास्कचे संचालक प्राजक्ता आणि राखी असतात. टास्कमध्ये राकेश टोकदार वस्तूचा वापर करताना दिसतो. ज्यामुळे बिग बॉस त्याला थांबवतात. राकेश वेणी कापतो. आता बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन कोण होणार? या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Nomination
Famous Actor Death : ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com