Bigg Boss Marathi 6 : "आवाज जास्त चढवू नकोस..."; सागर कारंडे अन् प्रभूमध्ये टोकाचे भांडण, बिग बॉसच्या घरातील वातावरण तापले|VIDEO

Sagar karanda -Prabhu Shelke Fight : 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सागर सागर कारंडे आणि प्रभू यांच्यात मोठा वाद झाला आहे. बिग बॉसच्या घरात काळू डॉनचा पहिल्यांदाच आवज वाढलेला दिसत आहे.
Sagar karanda -Prabhu Shelke Fight
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात 8 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

सागर कारंडे आणि प्रभूमध्ये भांडण होतात.

प्रभू रुचिताची नक्कल करताना दिसतो.

बिग बॉसच्या घरात वाद वाढताना दिसत आहे. एकीकडे राकेश आणि दिपालीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सागर आणि प्रभू यांच्यात वाद झाला आहे. शो सुरू झाल्यापासून काळू डॉन म्हणजे प्रभूचा आवाज आता चढलेला पाहायला मिळत आहे. ज्यामुळे चाहते देखील थक्क झाले आहेत. घरातील सदस्य यांच्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यांच्यात नेमका वाद कशावरून होतो जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरात सागर कारंडे आणि प्रभूमध्ये जोरदार भांडण झाले आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात प्रभू आणि सागर दोघांचाही आवाज वाढलेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, सागर कारंडे म्हणतो, "ए प्रभू आवाज जास्त चढवू नकोस", त्यावर प्रभू त्याला म्हणतो, "काय बोलला?", त्यानंतर सागर कारंडे म्हणतो की, "कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत की तू आता काहीही बोलशील कोणाला", त्यावर प्रभू म्हणतो, "मी बोललोच नाही काही..."

सागर कारंडे आणि प्रभूमध्ये किचन एरियात वाद होतो. या वादाची सुरुवात रुचितापासून होते. कारण सर्वात आधी प्रभू शेळके आणि रुचिता जामदार यांच्यात वाद सुरू होतो. प्रभू रुचिताची नक्कल करताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. लिहिलं की, "घरातील वातावरण तापणार, डॉन आणि सागरमध्ये राडा होणार..." या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ज्यात सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार यांचा समावेश आहे. आता बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सागर की प्रभू कोणाची बाजू घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Sagar karanda -Prabhu Shelke Fight
Bigg Boss Marathi 6 : "रंग बदलताना दिसत आहेत लोक..."; दीपाली अन् राकेशची मैत्री तुटली? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com