Sagar Karande: सागर कारंडे फसवणूक प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांचा घोटाळा उघड

Sagar Karande Case: अभिनेता सागर कारंडे याच्या नावावर झालेल्या ६१ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Saagar Karande
Saagar KarandeSaam Tv
Published On

Sagar Karande: अभिनेता सागर कारंडे याच्या नावावर झालेल्या ६१ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली की अभिनेता सागर कारंडेने झटपट घरबसल्या पैसे कमावणाच्या नादात सायबर क्राईमला बळी पडून स्वतःचे ६१ लाख रुपयांचे नुकसान केले होते . परंतु, नंतर सागरने सांगितले की तो व्यक्ती मी नसून दुसरा कोणी आहे. या ६१ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास अनेक दिवस सुरु असून पोलीस अखेर आरोपी पर्यंत पोहोचले आहेत.

या प्रकरणात सागर कारंडे याच्या नावाचा वापर करून आर्थिक व्यवहार केले गेले. त्याच्या ओळखीचा गैरफायदा घेत गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली होती. या व्यवहारात सागर कारंडे याचा थेट सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात अजून काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Saagar Karande
Priti Zinta : कोलकात्याला हरवलं, पंजाबची मालकीन झाली खूश, युझवेंद्र चहलला दिली 'जादू की झप्पी'

नेमकं प्रकरण काय

काही दिवसांपूर्वी सागर कारंडे नामक केला व्यक्तीची ६१ लाखांची फसवणूक झाल्याची माहिती उघड झाली आणि एकच नाव असल्यामुळे अभिनेत्याची फसवणूक झाल्याचा समज निर्माण झाला. फसवणूक झालेल्या सागरला एका अनोळखी महिलेने 25 फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर एक मेसेज केला. यामध्ये महिलेने सागर]ला एक स्किम सांगितली. तिने इन्स्टाग्रामवरील पोस्ट ‘लाईक’ करण्याचे काम दिले आणि प्रत्येक लाईकवर 150 रुपये मिळतील, असे सांगितले. यामुळे दिवसाला ६,००० रुपये कमावता येईल असा विश्वास तिने त्याला दिला आणि ६१ लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार लक्षात येत सागरने पोलिसांकडे घाव घेतली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Saagar Karande
Neha kakkar: नेहा कक्कर बहिणीला विसरली; टोनीसाठी केला टॅटू पण सोनूच नावही नाही, चाहते संतापले

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अभिनेता सागर कारंडेने यावर प्रतिक्रिया देत सांगितले मी एकटाच सागर कारंडे नाही… माझ्यासोबत असे काही घडले नाही… मी लावकरच अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतंल आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार आणि नक्की अभिनेता सागर कारंडेची फसवणूक झाली नाही ना याचा खुलासा लवकरच होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com