Sagar Karande: 'मी एकटाच सागर नव्हे...'; घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात गमावले ६१ लाख रुपये? अभिनेत्याने सांगितलं सत्य

Sagar Karande Fraud: चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. पण आता यावर मौन सोडत सागरने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
Sagar Karande Photos
Sagar Karande Photos Instagram/ @saagarkarande
Published On

Sagar Karande Fraud: मराठी अभिनेते सागर कारंडे याची ६१ लाखांहून अधिक रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. एका ‘इंस्टाग्राम पोस्टला लाईक करा आणि पैसे कमवा’ या स्कीमच्या माध्यमातून ही फसवणूक झाली. असल्याचे वृत्त आले होते. मात्र सागर कारंडे याने स्वतः पुढे येत एक स्पष्टीकरण देत सांगितले की, "मी कुठल्याही प्रकारे फसवणुकीचा बळी ठरलो नाही."

सागर कारंडेने स्पष्टीकरण देत सांगितले की, “ सागर कारंडे नावाचा मी एकटाच नव्हे गुगलवर तुम्ही सर्च केले तर खूप दिसतील. ही बातमी खोटी आहे. मी कोणतीही तक्रार सायबर पोलिसांकडे केलेली नाही. ना माझं कुठलंही आर्थिक नुकसान झालं आहे. माझा या प्रकाराशी काहीही संबंध नाही. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.” त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sagar Karande Photos
Panchayat Season 4: ग्रामसेवक आणि सरपंच पुन्हा सापडणार नव्या अडचणीत; फुलेरा गावाची 'पंचायत' कधी बसणार?

या प्रकरणात अनेक वृत्तसंस्थांनी चुकीची माहिती दिली असल्याचं सागरने सांगितलं आहे. त्याने यासंदर्भात नाराजी व्यक्त करत म्हटले, "माध्यमांनी बातम्या छापण्याआधी वस्तुस्थिती तपासली पाहिजे. अशा खोट्या बातम्यांमुळे कलाकारांचे नाव धोक्यात येते."

Sagar Karande Photos
Sikandar box office collection day 5: सलमान खानच्या 'सिकंदर'ची घसरण, १,१०० शो रद्द, पाच दिवसात फक्त 'इतके' कोटीच कमावले

सागर कारंडे याच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे चाहत्यांनीही त्यांचं समर्थन केलं आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली आणि खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com