Priti Zinta : कोलकात्याला हरवलं, पंजाबची मालकीन झाली खूश, युझवेंद्र चहलला दिली 'जादू की झप्पी'

Priti Zinta and Yuzvendra Chahal: IPL 2025 च्या एका चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सने केवळ १११ धावा करताही कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. यामुळे अभिनेत्री प्रीती झिंटाने त्याला ग्राउंडवर मिठी मारली.
Priti Zinta and Yuzvendra Chahal
Priti Zinta and Yuzvendra ChahalSaam Tv
Published On

IPL 2025 च्या एका चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सने केवळ १११ धावा करताही कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. या विजयामध्ये क्रिकेटर युझवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या आणि त्याची ही कामगिरी कौतुकास्पद होती. या कामगिरीवर खुश होऊन पंजाब किंग्सची सहमालक अभिनेत्री प्रीती झिंटाने त्याला ग्राउंडवर मिठी मारली ज्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

विजयानंतर प्रीती झिंटाने युजवेंद्र चहलचे अभिनंदन केले

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर चहलसाठी एक खास पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केलं तसेच त्याला 'हिरो' म्हणून संबोधले आहे. मंगळवारी, युजवेंद्रने उत्तम कामगिरी करून सामना फिरवला, चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि पीबीकेएसला केकेकेवर १६ धावांनी विजय मिळवून दिला. हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. हा सामना आयपीएलच्या इतिहासात कमी धावसंख्येवर मिळालेल्या विशेष विजयांपैकी एक ठरला.

Priti Zinta and Yuzvendra Chahal
Don 3: 'डॉन ३' मध्ये कियारा अडवाणीच्या जागी येणार नवा चेहरा; चित्रपटासाठी 'या' दोन अभिनेत्रींमध्ये चढाओढ सुरु

विजयानंतर प्रीती आनंदाने ग्राऊंडवर गेली, तिथे तिने युजवेंद्रला मिठी मारली आणि गप्पा मारल्या. प्रीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या आणि खेळाडूंमधील बंधाचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये, ती क्रिकेटपटूशी बोलताना खूप आनंदी दिसत आहे.

Priti Zinta and Yuzvendra Chahal
Vincy Aloshious: 'आधी ड्रग्ज दिले नंतर माझ्यासोबत...; प्रसिद्ध अभिनेत्रीचे सहकलाकारावर गंभीर आरोप

प्रीती झिंटाचा पुढचा बॉलिवूड प्रोजेक्ट

राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून प्रीती हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाद्वारे ती काही काळाच्या विश्रांतीनंतर रुपेरी पडद्यावर परतणार आहे. 'लाहोर १९४७' हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे आणि यात सनी देओल, शबाना आझमी, अली फजल आणि करण देओल यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com