Vincy Aloshious: 'आधी ड्रग्ज दिले नंतर माझ्यासोबत...; प्रसिद्ध अभिनेत्रीचे सहकलाकारावर गंभीर आरोप

Actress Vincy Aloshious: मल्याळम अभिनेत्री विन्सी अलोयसियसने एका सहकलाकारावर दुर्व्यवहाराचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, एका शूटिंगदरम्यान सहकलाकार ड्रग्ज घेऊन आला होता.
Actress Vincy Aloshious
Actress Vincy AloshiousSaam Tv
Published On

Vincy Aloshious: चित्रपटसृष्टीत, मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मल्याळम चित्रपट असो, ड्रग्जमुळे होणाऱ्या अपघाती घटनांबद्दल सावधगिरी बाळगणे हा एक सततचा मुद्दा आहे. अलिकडेच, मल्याळम अभिनेत्री विन्सी अलोयसियसने एका सहकलाकारावर दुर्व्यवहाराचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, एका शूटिंगदरम्यान सहकलाकार ड्रग्ज घेऊन आला आणि नंतर त्या कलाकाराने तिच्याशी असभ्य वर्तन केले. ही घटना अलीकडील एका फिल्मच्या चित्रीकरणावेळी घडल्याचे ती म्हणते.

तिचा सहकलाकाराने ड्रग्ज...

विन्सी अलीकडेच एका ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "जर मला माहित असते की माझा सहकलाकार ड्रग्ज घेतो, तर मी त्याच्यासोबत काम कधीच केले नसते ." तिने तिच्या वैयक्तिक अनुभवांवर प्रकाश पडला. अभिनेत्री म्हणाली की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप अस्वस्थ परिस्थितीचा सामना करावा लागला कारण तिचा सहकलाकाराने ड्रग्ज घेतले होते.

Actress Vincy Aloshious
Don 3: 'डॉन ३' मध्ये कियारा अडवाणीच्या जागी येणार नवा चेहरा; चित्रपटासाठी 'या' दोन अभिनेत्रींमध्ये चढाओढ सुरु

'त्याने माझ्या ड्रेसबद्दल...'

विन्सीने सांगितले की शूटिंग दरम्यान तिच्या ड्रेसमध्ये काही समस्या होती, जे तिला ठीक करायचे होते. मग तिच्या सहकलाकाराने हास्यास्पद पद्धतीने सर्वांना सांगितले की तो तिला तिचा ड्रेस ठीक करण्यास मदत करत आहे. एवढेच नाही तर त्याने न विचारता ड्रेसला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण घटना हास्यस्पदप्रकारे समोर आणली.

Actress Vincy Aloshious
Sai Tamhankar: 'आलेच मी...' ; सई ताम्हणकरची ठसकेदार लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, काही वेळाने त्या माणसाच्या तोंडातून पांढऱ्या पावडरसारखे काहीतरी बाहेर पडले. तेव्हाच त्यांना कळले की तो ड्रग्जच्या प्रभावाखाली आहे. विन्सी म्हणाली, "जर तुम्हाला ड्रग्ज घ्यायचे असतील तर तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण कामाच्या ठिकाणी असे करणे आणि इतरांना त्रास देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे."

विन्सीच्या या आरोपांमुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या समर्थनार्थ अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. विन्सीने सोशल मीडियावर आणि मुलाखतीतून या घटनेबद्दल आवाज उठवला असून तिने हा अनुभव अत्यंत त्रासदायक असल्याचे सांगितले. तिला विश्वास होता की ती एका सुरक्षित वातावरणात काम करत आहे, पण या प्रकारामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com