Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये Wild card एन्ट्री; 'त्या' स्पर्धकाला पाहताच सदस्यांना बसला 440 व्होल्टचा धक्का| VIDEO

Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry : बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ज्यामुळे घरातील सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे. घरात नवीन कोण येणार, जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली आहे.

बिग बॉसच्या घरात आता वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

वाइल्ड कार्ड स्पर्धकाला पाहताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो.

बिग बॉसच्या घरात पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने बिग बॉसचा खेळ सुरू झाला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी राधा पाटीचा घरातील प्रवास थांबल्याचे सांगितले. त्यानंतर राधा खूपच भावुक झाली. त्यामुळे 'टोळी'तला एक सदस्य देखील कमी झाला. आता बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

राधाच्या एक्झिटनंतर आता बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. याची खास झलक समोर आली आहे. नुकताच 'बिग बॉस मराठी 6'चा नवीन प्रोमो आला आहे. ज्यात घरात वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये बिग बॉस बोलतात की, "आता येत आहे 'बिग बॉस मराठी सीझन 6' चे पहिले वाइल्ड कार्ड सदस्य..." घरातील इतर सदस्य नव्या सदस्य कोण असेल हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक दिसले.

बिग बॉसच्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्याला पाहताच घरातील सदस्यांचे हावभाव बदलले. वाइल्ड कार्ड सदस्याला पाहताच प्राजक्ता शुक्रेला खूप आनंद झाला. तर रुचिता जामदारला चांगलाच मोठा धक्का बसला. बाकी घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन, धाकधूक पाहायला मिळाली. मात्र व्हिडीओत वाइल्ड कार्ड स्पर्धकाचा चेहरा दिसला नाही. त्यामुळे अधिकृतरित्या वाइल्ड कार्ड स्पर्धक कोण, याचा खुलासा झाला नाही.

वाइल्ड कार्ड सदस्य कोण?

वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार हे समजताच प्रेक्षक अनेक कलाकारांची नावे घेताना दिसत आहेत. काही म्हणतात की, राधा गेल्यामुळे घरात महिला वाइल्ड कार्ड स्पर्धक येईल. तर काही प्रेक्षक बिग बॉस 19 हिंदीचा सदस्य प्रणित मोरेचे नाव घेत आहे. तसेच गौतमी पाटील, रसिका सुनील, डॅनी पंडित यांचीही नावे चांगली चर्चे आहे. मात्र आता बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून कोणता कलाकार येणार, हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6-Wild Card Entry
Laughter Chef 3 Winner : शेवटच्या क्षणी 'काटा' अन् 'छुरी'मध्ये टक्कर; 'लाफ्टर शेफ सीझन 3'ची ट्रॉफी कोणी जिंकली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com