Laughter Chef 3 Winner : शेवटच्या क्षणी 'काटा' अन् 'छुरी'मध्ये टक्कर; 'लाफ्टर शेफ सीझन 3'ची ट्रॉफी कोणी जिंकली?

Laughter Chef 3 Winner Team And Prize : 'लाफ्टर शेफ सीझन 3' चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. विजेती टीम कोणती आणि बक्षिस काय मिळाले, जाणून घेऊयात.
Laughter Chef 3 Winner Team And Prize
Laughter Chef 3 Winnersaam tv
Published On
Summary

'लाफ्टर शेफ सीझन 3'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला.

'लाफ्टर शेफ सीझन 3'चे होस्टिंग कॉमेडियन भारती सिंहने केले.

'लाफ्टर शेफ सीझन 3' हा लोकप्रिय कुकिंग शो आहे.

'लाफ्टर शेफ सीझन 3' चा ग्रँड फिनाले काल ( 25 जानेवारी 2026 - रविवारी) थाटामाटात पार पडला आहे. हा कॉमेडियन भारती सिंह होस्ट करत असलेला लोकप्रिय कुकिंग शो आहे. 'लाफ्टर शेफ सीझन 3' ची ट्रॉफी 'टीम काटा' ने उचलली आहे. त्यांनी टीम छुरीला मात दिली आहे. या शोचे होस्टिंग भारती सिंहसोबत शेफ हरपाल सिंह सोखी यांनी केले. शोचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'लाफ्टर शेफ सीझन 3'मध्ये किचनमधील भांडणे, मजेदार क्षण, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळाला. शोला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'लाफ्टर शेफ सीझन 3' च्या शेवटच्या भागात टीम काटा आणि टीम छुरी यांच्यात सामना झाला. शेवटी, 'लाफ्टर शेफ सीझन 3' च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. विजेत्या टीमला शानदार ट्रॉफी देण्यात आली.

बक्षीस काय?

टीम 'काटा' ला सुंदर ट्रॉफीसोबत रोख रक्कम देखील मिळाले. मीडिया रिपोर्टनुसार, 'लाफ्टर शेफ सीझन 3'च्या विजेत्या टीमला किती बक्षिसाची रक्कम मिळाले हे अद्याप अधिकृत रित्या जाहीर झाले नाही. मात्र असे बोले जाते की, या शोच्या विजेत्यांना सहसा लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते.

टीम 'काटा' चे सदस्य

  • अली गोनी

  • जन्नत जुबेर

  • कृष्णा अभिषेक

  • कश्मीरा शाह

  • अभिषेक कुमार

  • समर्थ जुरे

'लाफ्टर शेफ सीझन 3' चे स्पर्धक

'लाफ्टर शेफ सीझन 3' मध्ये खूप तगडे स्पर्धक पाहायला मिळाले. ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यात अली गोनी, जन्नत झुबेर, करण कुंद्रा, एल्विश यादव, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, अभिषेक कुमार आणि समर्थ जुरेल झळकले. तसेच त्यानंतर शोमध्ये तेजस्वी प्रकाश, विवियन दसेना, ईशा मालवीय, ईशा सिंग, गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे कलाकार देखील पाहायला मिळाले.

Laughter Chef 3 Winner Team And Prize
Border 2 Box Office Collection : 'बॉर्डर 2'चा रविवारी बॉक्स ऑफिसवर धुरळा; 120 कोटींपार कमाई, सनी देओलची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com