Border 2 Box Office Collection : 'बॉर्डर 2'चा रविवारी बॉक्स ऑफिसवर धुरळा; 120 कोटींपार कमाई, सनी देओलची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Border 2 Box Office Collection Day 3 : 'बॉर्डर 2' चित्रपटाने तीन दिवसांत 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Border 2 Box Office Collection Day 3
Border 2 Box Office Collectionsaam tv
Published On
Summary

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'बॉर्डर 2'ने पुन्हा एकदा 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला आहे.

'बॉर्डर 2' सनी देओलचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

'बॉर्डर 2'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी करत आहेत. 'बॉर्डर 2' चित्रपट 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आला आहे. सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने तीन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चित्रपटाचे संडे कलेक्शन जाणून घेऊयात.

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'बॉर्डर 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 35 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. तसेच चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' ने तिसऱ्या दिवशी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 121 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

  • पहिला दिवस - 30 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 36.5 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 54.5 कोटी रुपये

  • एकूण - 121 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2' चित्रपट सनी देओलच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठी कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 'गदर 2' हा सनी देओलचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. 'गदर 2' चित्रपट 2023 ला रिलीज झाला आहे.

'बॉर्डर 2' ने 'धुरंधर' चा रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडला आहे. 'धुरंधर'ने पहिल्या आठवड्याच्या शेवटी 106.5 कोटी रुपयांची कमाई केली, तर 'बॉर्डर 2' आठवड्याच्या शेवटी तब्बल 121 कोटी रुपये कमावले आहेत. 'बॉर्डर 2' पहिल्या रविवारी 54.5 कोटी कमावले, तर 'धुरंधर'ने पहिल्या रविवारी 44.80 कोटींचे कलेक्शन केले होते.

Border 2 Box Office Collection Day 3
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच राधा पाटीलचं मोठं विधान, 'लावणी'वरून हिणवणाऱ्यांना रडत रडत दिलं उत्तर|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com