Avinash Jadhav : "₹३०० चा हप्ता घेतात अन्..." व्यवसाय करणाऱ्या मराठमोळ्या तरूणीला डोंबिवलीत त्रास, राज ठाकरेंचा आदेश येताच....

Dombivli Ekta Sawant Shwarma Stall : डोंबिवली स्टेशनबाहेर मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई करून परप्रांतीय फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर राज ठाकरे व मनसेने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
Avinash Jadhav : "₹३०० चा हप्ता घेतात अन्..." व्यवसाय करणाऱ्या मराठमोळ्या तरूणीला डोंबिवलीत त्रास, राज ठाकरेंचा आदेश येताच....
Dombivli Ekta Sawant Shwarma StallSaam tv
Published On
Summary
  • डोंबिवली स्टेशनबाहेर मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई

  • परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई नसल्याचा आरोप

  • सोशल मीडियावरील हाकेला राज ठाकरे व मनसेची दखल

  • केडीएमसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, मनसे आक्रमक

राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद काही नवीन नाही. मात्र आता डोंबिवलीत स्टेशन बाहेरील फेरीवाले आणि मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने एकता सावंत ही मराठी तरुणी डोंबिवली स्टेशन बाहेर शोरमाचा स्टॉल लावते आणि पोटाची खळगी भरते. परंतु दिवसरात्र एक करून कष्ट करणाऱ्या तरुणीच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. शिवाय तिचा स्टॉल तिथून काढण्यात आला. मात्र आजुबाजूला बसलेल्या परप्रांतीयांच्या धंद्यांना कोणी बोट सुद्धा लावलं नाही. यावरून संतापलेल्या तरुणीने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर मदतीची आणि न्यायाची आर्त हाक मारली. तिच्या या याचनेची दखल राज ठाकरे यांनी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे डोंबिवलीत दाखल झाले. त्यांनी या मराठी तरुणीची दखल घेत तिची भेट घेतली. यावेळेस ही तरुणी म्हणाली की, मी नेहमी या ठिकाणी स्टॉल लावते. माझ्या आजूबाजूला अनेक परप्रांतीय पोट भरण्यासाठी व्यवसाय करतात. दारूच्या नशेत अनेकजण इथे फिरतात, तसेच अवैध धंदे करतात. मात्र इथे त्यांना कोणीही काही बोलत नाही. परंतु तिच्या स्टॉलवर पालिकेने कारवाई केली असल्याचं तरुणीने म्हटलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या तरुणीने असेही म्हटले की तिच्याकडून दररोज ३०० रुपये हप्ता घेण्यात येतो. यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातो आहे.

महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाले आहे. दरम्यान, मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ होताना दिसून आली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. शिवाय अविनाश जाधव यांनी तरुणीला पाठबळ देत म्हटलं आहे की, तू तुझा स्टॉल सुरु कर. बघू कोण काय करत ते. अविनाश जाधव आणि मनसैनिक यांच्या पाठिंब्याने तरुणीला दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com