Shreya Maskar
सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल......... इतक्या कोटींची कमाई केली आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाची कथा 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. जवळपास 26 वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत.
सनी देओलने 'बॉर्डर 2' चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतले आहे. चित्रपटातील सनी देओलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वरुण धवनला 'बॉर्डर 2'साठी अंदाजे 8 कोटी ते 10 कोटी फी मिळाली आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला 4-5 कोटी रुपये रुपये फी 'बॉर्डर 2' साठी मिळाले आहेत. 'बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला.
अहान शेट्टीचे मानधनाची रक्कम समोर आली नाही. परमवीर सिंह चीमाने 'बॉर्डर 2' चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. पहिल्या चित्रपटासाठी त्याला 50 ते 80 लाख रुपयांचे मानधन मिळाले आहे.